पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांच्या नेमप्लेटवर शाईफेक, भाजप नगरसेविकेची रवानगी येरवडा कारागृहात

आशा शेंडगे या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी दापोडी प्रभागातून भाजप नगरसेविका आहेत. आशा शेंडगे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर जोरदार हंगामा केला होता.

पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांच्या नेमप्लेटवर शाईफेक, भाजप नगरसेविकेची रवानगी येरवडा कारागृहात
पिंपरी-चिंचवड महापालिका
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 9:22 AM

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या (Pimpri Chinchwad Municipal Commissioner) नामफलकावर शाई फेकल्या प्रकरणी अटकेत असलेल्या भाजप नगरसेविकेची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नगरसेविका आशा शेंडगे (Aasha Shendge) यांच्यासह त्यांच्या 11 समर्थकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी पुणे येथील येरवडा कारागृहात करण्यात आल्याची माहिती आहे.

आशा शेंडगे या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी दापोडी प्रभागातून भाजप नगरसेविका आहेत. आशा शेंडगे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर जोरदार हंगामा केला होता. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटा महापालिका आयुक्त कार्यालयात तैनात करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

पिंपरी चिंचवडमधील कासारवाडीत गणेशोत्सवाच्या काळात भूमिगत गटारांच्या बांधकामासाठी रस्ते खोदकाम केले जात आहे. यामुळे रहदारीला अडथळा ठरतो, असे सांगत आशा शेंडगे यांनी पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांच्या महापालिका कार्यालयातील नामफलकावर शाई फेकली होती.

स्मार्ट सिटीच्या कामांसाठी खोदकाम

रस्ते खोदकामाच्या मुद्द्यावर आशा शेंडगे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याशी चर्चा केली होती, तेव्हा त्यांनी खोदकाम थांबवण्याचे आश्वासन दिले होते. असे असतानाही स्मार्ट सिटीच्या कामांसाठी खोदकाम सुरू करण्यात आले. स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांना विचारले असता, त्यांनी मात्र खोदकाम होणार असल्याचे स्पष्ट केले होते.

शेंडगेंनी पालिका मुख्यालय गाठलं

यामुळे नगरसेविका आशा शेंडगे यांचा पारा चढला. त्यांनी महिला कार्यकर्त्यांसह पालिका मुख्यालय गाठले. आधी त्या मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या भालकर यांच्या कार्यालयात गेल्या. जेव्हा ते त्यांच्या कार्यालयात भेटले नाहीत, तेव्हा शेंडगे यांनी सर्व महिलांसह चौथ्या मजल्यावर असलेले महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचे कार्यालय गाठले.

नेमकं काय घडलं?

येथे पोहोचल्यानंतर महिलांसोबत बसून त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काही महिलांनी शाईची बाटली आणली होती. भालकर यांच्या चेहऱ्याला शाई फासण्याची त्यांची योजना होती, असे सांगितले जात आहे. मात्र ते भेटले नाहीत, आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शेंडगेंना महापालिका आयुक्तांना भेटू दिले नाही, तेव्हा महिलांनी त्याच्या नेमप्लेटवर शाई फेकून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

त्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या नंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासह त्यांच्या 11 समर्थकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आलीय

संबंधित बातम्या :

पुणे एसीबीची धडक कारवाई! महापालिकेत लाचखोरांची संख्या जास्त तर महसूल विभागात सर्वाधिक कारवाया

पिंपरी-चिंचवड महापालिका लाचखोरी प्रकरण, स्थायी समितीच्या अध्यक्षांसह तिघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.