पुणे शहरातील १९ वर्षीय विद्यार्थी इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये, एनआयए पोहचले घरी

Pune ISIS module and Crime News | ठाणे जिल्ह्यातील पडघा गावात देशभरातील दहशतवादी कारवायांसाठी युवकांना जमवण्याचे काम सुरु होते. त्यानंतर अमरावतीमधील अचलपूरमध्ये इसिसच्या संपर्कात युवक आल्याचे स्पष्ट झाले. आता पुणे शहरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे शहरातील १९ वर्षीय विद्यार्थी इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये, एनआयए पोहचले घरी
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 1:07 PM

अभिजित पोते, पुणे, दि.18 डिसेंबर | महाराष्ट्रात अनेक भागात इसिस मॉड्यूलच्या कारवाया सुरु होत्या. पुणे पोलिसांनी सर्वात प्रथम हा प्रकार उघड केला. एका मोटारसायकल चोरी प्रकरणात महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोघांना 18 जुलै रोजी पकडले होते. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा फरार झाला होता. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र दहशतवादी पथकाने केला. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) तपास देण्यात आला. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर या शहरापर्यंत पोहचलेले इसिस मॉड्यूल अमरावती जिल्ह्यात आले. आता पुणे शहरात इसिस मॉड्यूलच्या संपर्कात आलेल्या एका विद्यार्थ्यास कारवाई करण्यात आली.

पुण्यात १९ वर्षीय तरूणाची एनआयएकडून चौकशी

पुण्यात १९ वर्षीय तरूणाची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सॅलिसबरी पार्कमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याची एनआयएकडून सोमवारी चौकशी करण्यात आली आहे. त्याचे मोबाईल आणि इलेक्ट्रॅानिक डिव्हाइस जप्त करण्यात आले आहे. बंगळुरुमधील इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तो सहभागी झाला. संबधित तरुणाची कसून चौकशी एनआयएचे पथक करत आहे. विद्यार्थ्यांच्या चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अचलपूरमधील विद्यार्थ्यास अमरावतीत आणले

अमरावतीच्या अचलपूर शहरमध्ये मध्यरात्री NIA ने केलेल्या छापेमारीत एका विद्यार्थ्यांला ताब्यात घेण्यात आले. त्या विद्यार्थ्यास अमरावतीला आणले गेले आहे. अमरावतीमध्ये एका ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तात त्याची कसून चौकशी NIA कडून सुरु आहे. NIA ने ताब्यात घेतलेला हा विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असण्याचा संशय NIA ला आहे. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याकडून लॅपटॉप आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्रीच अचलपूर, परतवाडा आणि समरसपुरा पोलिसांचा बंदोबस्त घेऊन ही कारवाई एनआयएने केली आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबईत सुरु असलेले इसिस मॉड्यूल आता विदर्भात आल्याचे यामुळे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

हे ही वाचा…

महाराष्ट्रातील या गावात सरळ सिरियातील हँडलकडून संदेश, NIA चे पथक पोहचले

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.