Pune News : भूलतज्ज्ञ असलेला डॉक्टर, अनेक भाषांचे ज्ञान पण निघाला ‘इसिस’ समर्थक, NIA कडून अटक

Pune Crime News : पुणे शहरात दीड वर्षांपासून दहशतवादी राहत होते. यापैकी दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. आता एनआयएने आणखी एकास पुण्यातून अटक केली आहे. अटक केलेला व्यक्ती डॉक्टर आहे.

Pune News : भूलतज्ज्ञ असलेला डॉक्टर, अनेक भाषांचे ज्ञान पण निघाला ‘इसिस’ समर्थक, NIA कडून अटक
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 12:17 PM

पुणे | 28 जुलै 2023 : पुणे शहरात राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी छापा टाकला. या छाप्यात मोठी कारवाई करण्यात आली. एका डॉक्टरास अटक केली आहे.  यापूर्वी पुणे शहरात १८ जुलै रोजी दोन जणांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्या दोघांचा संबंध जयपूर बॉम्ब ब्लॉस्ट प्रकरणाशी होता. एनआयएच्या मोस्ट वॉटेंडच्या यादीत ते होते.  महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी अशी या दोघांची नावे आहे. त्यांचा एटीएस तपास करत आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) एका डॉक्टरास अटक केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

कोण आहे तो डॉक्टर

राष्ट्रीय तपास संस्था महाराष्ट्रातील ISIS नेटवर्कचा तपास करत आहे. या प्रकरणात यापूर्वी चार जणांना अटक केली आहे. आता गुरुवारी पुणे शहरातून राज्यातील पाचवी अटक झाली आहे. पुण्यातून डॉ.अदनान अली सरकारला अटक केली आहे. कोंढवा परिसरात राहणारा हा डॉक्टर भूलतज्ज्ञ आहे. ४३ वर्षीय या डॉक्टरास १६ वर्षांचा अनुभव आहे. त्याच्या घराची तपासणी केल्यावर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे आणि इतर अनेक आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे. ते सील करण्यात आले.

बीजेमधून केले MBBS

डॉक्टर अदनान अली सरकार याने 2001 मध्ये पुण्यातील बीजे शासकीय महाविद्यालयातून MBBS केले. त्यानंतर 2006 मध्ये MD एनेस्थीसिया (भूलतज्ज्ञ) केले. ISIS समर्थक असलेला डॉ अदनान याला इंग्रजी, हिंदी, मराठी, आणि जर्मन भाषेचे ज्ञान आहे. अनेक पुस्तकांमध्ये त्याने लिखाण केले आहे.

हे सुद्धा वाचा

28 जून रोजी झाली होती पहिली अटक

एनआयएकडून महाराष्ट्रातील ISIS नेटवर्कचा तपास प्रकरणात 28 जून रोजी पहिला गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात 3 जुलै रोजी मुंबईमधून तिघांना तर पुण्यातून एकाला अटक केली होती. आता डॉ.सरकारच्या माध्यमातून पुण्यातून अटक झालेला दुसरा व्यक्ती आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.