परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावीला अटक

ब्रुनेई इथं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत गोसावी याने विजय कुमारकडून 2 लाख 25 हजार रुपये उकळले होते. मात्र अद्याप नोकरी लावली नाही.

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावीला अटक
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावीला अटक
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 12:06 AM

पिंपरी चिंचवड : पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेला आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात काही दिवसापूर्वीं भोसरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने 2015 मध्ये पैसे घेतल्याचा आरोप करत किरण गोसावी याच्या विरोधात भोसरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. विजय कुमार सिद्धलिंग कानडे (33) या तरुणाने तक्रार दाखल केली होती.

हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक

ब्रुनेई इथं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत गोसावी याने विजय कुमारकडून 2 लाख 25 हजार रुपये उकळले होते. मात्र अद्याप नोकरी लावली नाही. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने गोसावीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी गोसावीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

परदेशी नोकरीचे आमिष दाखवून गोसावीकडून अनेक तरुणांची फसवणूक

परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने गोसावीने अनेक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती. तसेच मलेशियात नोकरी लावण्याच्या आमिषाने पुण्यातील चिन्मय देशमुख या तरुणाची 2018 मध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी चिन्मयची तीन लाखांना फसवणूक केली होती. त्यानंतर 2018 मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. (Kiran Gosavi arrested for cheating by offering job abroad)

इतर बातम्या

चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याने सूनेकडून सासऱ्याची कु्ऱ्हाडीने वार करुन हत्या

अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून आपलं निलंबन रद्द करण्यासाठी अर्ज केला, सचिन वाझेची जबाबात माहिती

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.