Kundmala Induri : सेल्फीच्या नादात विद्यार्थी पाण्यात बुडाला, अद्याप मुलाचा मृतदेह सापडला नाही
मोबाईच्या (Mobile) पायात आत्तापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. इंदिरा कॉलेज ताथवडे (Indira College Tathawade) येथे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सहा विद्यार्थी सेल्फी घेत होते. त्यावेळी ही घटना घडली आहे. कुंडमळा इंदूरी (Kundamala Induri) येथे आनंद मिश्रा हा विद्यार्थी पाण्यात बुडाला आहे.
मावळ – मोबाईच्या (Mobile) पायात आत्तापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. इंदिरा कॉलेज ताथवडे (Indira College Tathawade) येथे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सहा विद्यार्थी सेल्फी घेत होते. त्यावेळी ही घटना घडली आहे. कुंडमळा इंदूरी (Kundamala Induri) येथे आनंद मिश्रा हा विद्यार्थी पाण्यात बुडाला आहे. विद्यार्थी बुडाल्यानंतर सोबत असलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली, परंतु आनंद मिश्रा या तरूणाला वाचवता आले नाही. विद्यार्थी बुडाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रेस्क्यू टीम,आणि वन्य जीव रक्षक मावळ यांच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे. अद्याप विद्यार्थ्यांचा शोध लागलेला नाही.
नेमकं काय आहे प्रकरण
इंदिरा कॉलेज ताथवडे येथे शिकणारी सहा मुले कुंडमळा इंदूरी येथे फिरायला गेली होती. त्यावेळी आनंद मिश्रा हा मुलगा सेल्फीच्या नादात पाण्यात पडला. त्यावेळी त्याच्या मित्रांनी आरडा ओरड केली. स्थानिक ग्रामस्थ तिथं पोहचेपर्यंत विद्यार्थी पाण्यात बुडाला. घटनास्थळी लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीम,आणि वन्य जीव रक्षक मावळ यांच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे. दोन्ही टीम विद्यार्थ्याचा पाण्यात शोध घेत आहेत.
अजूनही या मुलाचा शोध लागलेला नाही
या पाण्यातील रांजण खळगे, खोल पाणी प्रवाह आणि जलपर्णीयामुळे शोधकार्यात मोठे अडथळे येत आहेत. घटनास्थळी आंबी एमआयडीसी पोलीस आणि रेस्क्यू टीम ने संपूर्ण पाण्याचा खोलीत शोध घेतला मात्र अद्यापही आनंद मिश्रा हा मुलगा सापडलेला नाही.