lalit Patil | मैत्रीणीसोबतचे हॉटेल-रुग्णालयातील फोटो व्हायरल?, आरोपी ललितची अय्याशी व्हायरल
Pune lalit patil drug case | पुणे येथील ससून रुग्णालयातून कैदी ललित पाटील फरार झाला होता. त्याला बुधवारी अटक करण्यात आली. आता ललित पाटील याचे एक, एक प्रकरण पुढे येऊ लागले आहे. त्याचे काही फोटो समोर आले आहे.
अभिजित पोते, पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ललित पाटील ड्रग्स प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. २ ऑक्टोंबर रोजी ललित पाटील फरार झाल्यानंतर पुणे पोलीस आणि ससून रुग्णालय प्रशासनावर प्रचंड टीका होत होती. अखेर ललित पाटील याला १८ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर ललित पाटील याने आपण पळला नव्हतो तर आपणास पळवले गेले होते, असा दावा केला. तसेच पुणे पोलिसांकडून आपल्यास धोका असल्याचे धक्कादायक विधान केले. ससून रुग्णालयात राहिल्यावर ललित पाटील याची कशी बडदास्त होत होती, त्याचे फोटो व्हायरल होत आहे.
ललित पाटील याचे मैत्रीणीसोबतचे फोटो
ललित पाटील याचे आणखी काही धक्कादायक फोटो व्हायरल झाले आहेत. त्या फोटोमध्ये रुग्णालयातील कैदीत त्याचे अलिशान जीवन दिसत आहे. ललित पाटील हा ससूनमध्ये सिगारेट ओढताना काही फोटोंमध्ये दिसत आहे. तसेच तो हॉटेलमध्ये मैत्रीणीसोबत दिसत आहे. हे सर्व फोटो व्हायरल झाले आहेत. यामुळे ललित पाटील याची अटक फक्त नावालाच होती. त्याला व्हिआयपी ट्रिटमेंट पुणे पोलीस आणि रुग्णालयातील प्रशासनाकडून मिळत होती, हे स्पष्ट झाले आहे.
दोघे महिलांना कोठडी
ललित पाटील याला मदत करणाऱ्या अर्चना किरण निकम आणि प्रज्ञा अरुण कांबळे यांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असताना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. या महिलांनी आरोपीनी ललित पाटील याला 25 लाख रुपयांची मदत केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच अधिक तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्यांना पुन्हा 23 ऑक्टोबरला कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
त्या सफारी गाडीची चौकशी
ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील याची काही वर्षांपूर्वी एका गॅरेजमध्ये सफारी गाडी लावली होती. आता ही गाडी पोलिसांना मिळाली आहे. काळ्या रंगाची ही सफारी कार ललित पाटील याने काही वर्षांपूर्वी सर्व्हिंगला लावली. मात्र त्यानंतर ही गाडी घेण्यासाठी कोणीही आलेले नाही. त्यामुळे ही गाडी ललित पाटील ड्रग्स रॅकेट चालवण्यासाठी वापरत होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.