बैलगाडा शर्यतीहून परतताना काळाचा घाला, पुण्यात 16 जणांसह निघालेल्या पिकअपचा टायर फुटला आणि…

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बेल्हा जेजुरी महामार्गावर लोणी येथे पिकअप गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

बैलगाडा शर्यतीहून परतताना काळाचा घाला, पुण्यात 16 जणांसह निघालेल्या पिकअपचा टायर फुटला आणि...
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 9:52 AM

सुनिल थिगळे, टीव्ही 9 मराठी, आंबेगाव, पुणे : पिकअप गाडीचा टायर फुटून भीषण अपघात (Pick Up Van Accident) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात (Ambegaon Pune) हा अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाला जागीच प्राण गमवावे लागले. तर तीन ते चार जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. बेल्हा जेजुरी महामार्गावर लोणी येथे पिकअप गाडीचा टायर फुटला. यावेळी पिकअप गाडीमधून एकूण 16 ते 17 तरुण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व जण बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) पाहण्यासाठी मावळ तालुक्यातील नानोली येथे गेले होते. शर्यतीहून परत येताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपघाता मृत्युमुखी पडलेला युवक पारनेर तालुक्यातील शिरपूर गावचा रहिवासी आहे, तर जखमी तरुण पिंपरखेड चोंभुत शिरपूर परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बेल्हा जेजुरी महामार्गावर लोणी येथे पिकअप गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

आकाश लोणकर असे मृत तरूणाचे नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिरपूर गावचा रहिवासी आहे तर जखमी तरुण पिंपरखेड चोंभुत शिरपूर परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे.

बैलगाडा शर्यतीनिमित्त मावळला

पिकअप गाडीमध्ये एकूण 16 ते 17 तरुण प्रवास करत होते. हे सर्व जण बैलगाडा शर्यतीसाठी मावळ तालुक्यातील नानोली येथे गेले होते. शर्यती संपल्यानंतर बैलगाडा घेऊन परतत असताना पिक अप गाडीचा टायर फुटल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या जखमींवर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

ड्रायव्हरची डुलकी जीवावर, गुरुभेटीला जाताना पुणेगावातील त्यागी महाराजांचा अपघाती मृत्यू

पंक्चर काढायला उभ्या ट्रकवर दुसरा ट्रक धडकला, मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात

CCTV | दुभाजक तोडून BMW विरुद्ध दिशेला, ट्रकवर धडकून कार उलटली, गोंदियात भीषण अपघात

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.