पुण्यात 1.2 कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, लहान मुलासह आलेल्या दोन महिलांकडून चोरी

ही घटना शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रविवार पेठेतील राजमल माणिकचंद आणि कं. ज्वेलर्स सराफ दुकानात घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिस प्रकरणाचा युद्ध पातळीवर तपास करत आहेत.

पुण्यात 1.2 कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, लहान मुलासह आलेल्या दोन महिलांकडून चोरी
पुण्यातील ज्वेलर्सच्या दुकानात चोरी
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 11:37 AM

पुणे : मुंबईहून दागिने विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाकडील तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे दागिने लांबवण्यात आले. सुमारे 3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने लहान मुलासह आलेल्या दोन महिलांनी लांबवल्याचा आरोप आहे. पुण्याच्या रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानात हा प्रकार घडला.

काय आहे प्रकरण?

ही घटना शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रविवार पेठेतील राजमल माणिकचंद आणि कं. ज्वेलर्स सराफ दुकानात घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिस प्रकरणाचा युद्ध पातळीवर तपास करत आहेत. त्यांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्या आधारे महिलांचा शोध घेत आहेत.

जिग्नेश नरेश बोराणा (33, रा. घाटकोपर, मुंबई) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेची खातरजमा करुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

दरम्यान, प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बोराणा आणि मुकेश चौधरी हे मुंबईहून पुण्यात दागिने विक्रीसाठी आले होते. ते रविवार पेठेतील एका ज्वेलर्सच्या दुकानात गेले. त्यांच्याकडे एक दागिन्यांची पेटी होती. त्यामध्ये सुमारे 1 कोटी 20 लाख रूपये किंमतीचे 3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने होते.

लहान मुलगा आणि दोन महिलांनी ती सोन्याचे दागिने असलेली पेटी पळवली. बोराणा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची भंबेरी उडाली. फिर्याद दाखल करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास फरासखाना पोलिस करीत आहेत.

सोलापुरातही लहान मुलांसह चोरी

दुसरीकडे, सोलापूर शहरातील लकी चौकात असलेल्या गणेश रामचंद्र आपटे या सराफ दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिला ग्राहकाच्या पाटल्यांची चोरी झाली होती. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यावेळी तीन महिला चोरांच्या सोबत एक लहान मुलगाही दिसत होता.

बॅगेतून पाटल्या लंपास

सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील राजस्व नगरातील प्रभावती ज्ञानोबा शिरगिरे या आपल्या पाटल्या बदलून घेण्यासाठी लकी चौकातील गणेश रामचंद्र आपटे या सराफ दुकानात गेल्या होत्या. पाटल्या त्यांनी बॅगेत ठेवल्या होत्या, मात्र त्या दुकानात राखी पाहत असताना त्याच वेळेस त्यांच्या बॅगेतून या पाटल्या महिला चोरांनी चोरल्या.

चोरी करुन महिला पसार

ही घटना सराफ दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली होती. पाटल्या चोरून महिला तिथून लगेच पसार झाल्या. घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेराची क्लिप पाहून चोरीचा गुन्हा दाखल केला होता

संबंधित बातम्या :

पाच महिलांची हातचलाखी, बसमध्ये बँक मॅनेजरच्या बॅगेतून अडीच लाख लांबवले, पुढे काय घडले?

VIDEO | ज्वेलरकडे खरेदीला आलेल्या ग्राहकाच्या पाटल्यांची चोरी, तीन महिला चोरांसोबत लहान मुलगाही

गाडीतून ऑईल गळती, लहान मुलाने गंडवलं, बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने 50 लाखांची लूट टळली

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.