Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लॅट नावावर करुन घेण्यासाठी पोटच्या मुलांकडून मारहाण, पुण्यात 58 वर्षीय महिलेची पोलिसात तक्रार

कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आईने सह्या कराव्यात, फ्लॅट नावावर करून द्यावा अशी पीडित महिलेच्या मुलांची आणि इतर नईमाबादी कुटुंबीयांची मागणी होती. पीडित महिला तयार नसल्याने मुलाने आईला खुर्ची फेकून मारली.

फ्लॅट नावावर करुन घेण्यासाठी पोटच्या मुलांकडून मारहाण, पुण्यात 58 वर्षीय महिलेची पोलिसात तक्रार
मुख्याध्यापकाला अमानुष मारहाण.
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 10:23 AM

पुणे : पोटच्या मुलांनीच आईचा छळ केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. संपत्तीमधील हिस्सा काढून घेण्यासाठी 58 वर्षीय महिलेचा छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. आईलाच बेदम मारहाण करणाऱ्या दोघा मुलांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

अहमद अब्बास अली नईमाबादी (वय 39 वर्ष) आणि हुसेन अब्बास अली नईमाबादी (वय 32 वर्ष) अशी या दोन मुलांची नावे आहेत. नईमाबादी कुटुंबीयांनी त्यांच्याच कुटुंबातील 58 वर्षीय महिलेचा छळ केल्याचा आरोप आहे. संपत्तीमधील आईचा हिस्सा काढून घेण्यासाठी हा छळ करण्यात आल्याचा आरोप आहे.

आईला खुर्ची फेकून मारली

कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आईने सह्या कराव्यात, फ्लॅट नावावर करून द्यावा अशी पीडित महिलेच्या मुलांची आणि इतर नईमाबादी कुटुंबीयांची मागणी होती. पीडित महिला तयार नसल्याने मुलाने आईला खुर्ची फेकून मारली. तसेच इतर कुटुंबीयांनी लाथा – बुक्क्यांनी मारहाण केल्याचा दावा केला जात आहे.

भावाच्या घरी गेल्याने जाचातून सुटका

या मारहाणीत पीडित महिला गंभीर जखमी झाली. तशाच अवस्थेत जीव वाचवत ती पुण्यातील नाना पेठे परिसरात असलेल्या आपल्या भावाच्या घरी पोहोचली. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. बंडगार्डन पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

जादूटोण्याच्या संशयातून चंद्रपुरात सात वृद्धांना मारहाण

दुसरीकडे, चंद्रपूर जिल्ह्यात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिवती तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून 7 जणांना खांबांना बांधून मारहाण केल्याचा प्रकार घडला. यामध्ये चार महिला आणि तीन वृद्धांचा समावेश आहे. ही मारहाण इतकी भीषण होती की पीडित सात पैकी पाच व्यक्तींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : जादूटोण्याचा संशय, सत्तरी ओलांडलेल्या वृद्धांसह 7 जणांना खांबाला बांधून मारहाण

कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'.
औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल
औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल.