मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, आर्थिक फसवणूक ते अनैसर्गिक बलात्कार, पुण्यात तिघांवर गुन्हा
मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झालेल्या युवतीवर बलात्कार करुन तिची आर्थिक फसवणूक करण्यात आली. बलात्कारानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी पीडितेला देण्यात आली होती. युवतीच्या नावे 38 लाख 57 हजार रुपये बँक लोन करुन आरोपीकडून फसवणूक करण्यात आली.
पुणे : मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झालेल्या युवतीवर बलात्कार करुन तिची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ही घटना घडल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपीसह तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींचा शोध सुरु आहे.
मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झालेल्या युवतीवर बलात्कार करुन तिची आर्थिक फसवणूक करण्यात आली. बलात्कारानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी पीडितेला देण्यात आली होती. युवतीच्या नावे 38 लाख 57 हजार रुपये बँक लोन करुन आरोपीकडून फसवणूक करण्यात आली.
काय आहे प्रकरण
मे 2017 मध्ये पीडिता आणि आरोपी यांची एका प्रसिद्ध मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झाली होती. लग्नाचे आमिष दाखवत आरोपी सचिन भाऊसाहेब गुंजाळ याने पेट्रोल पंपाचं लायसन्स काढण्यासाठी 5 लाख 30 हजार रुपयांचं लोन काढण्यास तरुणीला प्रोत्साहित केलं. 2018 मध्ये त्याचा भाऊ सागर गुंजाळने आयटीआर प्रॉब्लेमचं निमित्त सांगून 5 लाख 95 हजारांची रोख रक्कम घेतली, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.
त्यानंतर सचिन गुंजाळने मित्र श्रीकांत राजे आणि अभिजीत पवार यांच्याशी संगनमत करुन फिर्यादी तरुणी आणि तिच्या भावाला बिझनेस प्रपोजल सांगून पार्टनरशिप फर्म प्रोसिडिंगसाठी काही कोऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर त्यांनी हॉटेल व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याचं सांगून दोन बँकांमधून एकूण 15 लाख रुपयांचे कर्ज घेण्यास प्रोत्साहित केल्याचा आरोपही तक्रारदार तरुणीने केला आहे.
जबरदस्ती अनैसर्गिक संभोग
धक्कादायक म्हणजे, आपण एकट्या असताना आरोपी गुंजाळ दारुच्या नशेत घरी आला होता. त्यावेळी आपण त्याला दिलेल्या पैशांबद्दल विचारणा केली असता त्याने संतापून जबरदस्ती अनैसर्गिक संभोग केला. तसंच घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाकडे वाच्यता केल्यास आपल्याला आणि आपल्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याशिवाय शारीरिक संबंधांवेळी काढलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली, असंही तरुणीने फिर्यादीत म्हटलं आहे.
या प्रकरणी आरोपी आणि त्याचे दोन मित्र अशा तिघा जणांच्या विरोधात देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
संबंधित बातम्या :
CCTV | रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या कुटुंबातील लेकराचं अपहरण, चार तासात आरोपी गजाआड
पाकिस्तानचा मजनू, बॉर्डर पार करुन मुंबईत, लैला नेमकी कुठं गेली? सोशल मीडियावरची दिवानी लव्ह स्टोरी
नागपुरात एकाच दिवशी दोन खून! दुपारच्या रागाचा रात्री बदला; दारु पिण्याच्या वादातून खून