पिंपरी चिंचवड : पुण्यात दोघा जणांनी एटीएम फोडल्याचा (ATM theft) प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad) दोघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रात्री गस्तीवर असताना पोलिसांना एक एटीएम फोडलेल्या अवस्थेत दिसले, तर दुसऱ्या एटीएममध्ये संशयित आढळले. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले, तर एक पळून गेला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्यालाही ताब्यात घेतले. चैतन्य चौधरी आणि भानुदास दिघे अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची (Pune Crime) नावे आहेत. एटीएम फोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हुडी घातला, डोक्यावर रुमाल टाकला, चेहऱ्यावर मास्क लावला, तरी एटीएम फोडणारे सापडलेच.
पुण्यात दोघा जणांनी एटीएम फोडल्याचा घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात दोघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
रात्री गस्तीवर असताना पोलिसांना खराळवाडी जवळ एक एटीएम फोडलेल्या अवस्थेत दिसले तर दुसऱ्या एटीएममध्ये संशयित आढळले, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले तर एक पळून गेला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्यालाही ताब्यात घेतले
चैतन्य चौधरी आणि भानुदास दिघे अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. एटीएम फोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
CCTV | पिंपरी चिंचवडमध्ये एटीएम फोडणारे दोघे जेरबंद #Pune | #Crime | #PimpriChinchwad | #ATM pic.twitter.com/XZXbQ71zQG
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2022
संबंधित बातम्या :
ATM Fraud | ना पिन शेअर केला ना OTP, मुंबईत 22 ग्राहकांच्या खात्यातून 2.24 लाख काढले कसे?