“मी अहमदाबादचा पोलिस आयुक्त बोलतोय…” पुण्यात पोलिसांनाच गंडवणारा भामटा मुंबईत जेरबंद
"मी अहमदाबादचा पोलिस आयुक्त बोलतोय. तुमच्या शहरात बंदूक विक्रीची मोठी डील होणार आहे" असे हा भामटा पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन सांगत असे. त्यानंतर काही पोलिस अधिकाऱ्यांना वारंवार फोन करुन आरोपीने पैशांची मागणी करत असे
पिंपरी चिंचवड : पुण्यात पोलिसांनाच गंडा घालणाऱ्या एका भामट्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील गोरेगाव भागातून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अहमदाबादचे पोलीस आयुक्त बोलत असल्याचं सांगून तो पोलिसांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वीही त्याने पोलिसांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
काय आहे प्रकरण?
“मी अहमदाबादचा पोलिस आयुक्त बोलतोय. तुमच्या शहरात बंदूक विक्रीची मोठी डील होणार आहे” असे हा भामटा पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन सांगत असे. त्यानंतर काही पोलिस अधिकाऱ्यांना वारंवार फोन करुन आरोपीने पैशांची मागणी केल्याचंही समोर आलं आहे.
मुंबईतून भामट्याला अटक
संशय आल्याने पोलिसांनी सापळा रचला. त्याचा विश्वास संपदान करण्यासाठी त्याला पैसेही पाठवले. अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला गोरेगावमध्ये अटक केली आहे. यापूर्वीही त्याने पोलिसांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
बिल्डर विरोधात फसवणुकीचा गुन्हा
याआधी, अस्तित्वात नसलेला रस्ता दाखवून बांधकाम आराखडा मंजूर करून घेत, फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील तीन नामांकित बांधकाम व्यवसायिकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश मनोहर येवले, शाम जग्गनाथ शेंडे आणि सुनील पोपटलाल नहार अशी या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र बाळानाथ भुंडे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली होती.
संबंधित बातम्या :
सिल्लोड परिसरात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ,12 जखमी
सलमानकडे रिक्षा चालवण्याचं लायसन्स आहे का? काँग्रेस नगरसेविकेकडून कारवाईची मागणी
तेलंगणातून येत होता नागपुरात गांजा, बुटीबोरीत पोलिसांनी रचला सापळा; सात लाखांचा गांजा जप्त