बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 70 हजारांची लाच, पुण्यात 28 वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षक अटकेत

तक्रार अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस स्थानकातील महिला पोलिस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 70 हजारांची लाच, पुण्यात 28 वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षक अटकेत
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 9:27 AM

पिंपरी चिंचवड : बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. तर 70 हजार रुपयांची रक्कम स्वीकारणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन पसार झाला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

तक्रार अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस स्थानकातील महिला पोलिस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

28 वर्षीय महिला पोलीस अटकेत

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी महिलेला अटक केली आहे. हेमा सिद्धराम सोळुंके असं अटक केलेल्या 28 वर्षीय पोलिस उपनिरीक्षक महिलेचे नाव आहे. लाचेची 70 हजार रुपये रक्कम स्वीकारणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्‍ण देसाई हा एसीबीच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन फरार झाला.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या विरुद्ध सांगवी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल आहे. या तक्रार अर्जाची चौकशी आरोपी पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांच्याकडे असून अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली. त्यावरुन तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हातावर तुरी

25 आणि 26 नोव्हेंबरला पडताळणी केली असता आरोपी सोळुंके यांच्या सांगण्यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक देसाई यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 70 हजार रुपये ठरवले. 2 डिसेंबरला आरोपी देसाईंनी लाच स्वीकारली आणि त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यासाठी सापळा पथक पुढे सरसावलं असता, त्यांनी बाईक बेदरकारपणे चालवून लाचेच्या रकमेसह पळ काढला. आरोपी हेमा सोळुंके यांना ताब्यात घेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात गुन्हा नोंद करण्यात आला.

संबंधित बातम्या :

फेसबुक फ्रेण्डकडून हॉटेल रुममध्ये बलात्कार, अश्लील व्हिडीओ शूट करत 10 लाखांची मागणी

पतीची हत्या करुन मृतदेह शेतात जाळला, हिंगोलीत पत्नीसह दोन मुलं जेरबंद

Satara Murder | चारित्र्याच्या संशयातून बायकोला पेटवलं, महाबळेश्वरमधील पतीला जन्मठेपेची शिक्षा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.