दसऱ्याच्या दिवशी एक कोटी 18 लाखांचं ‘सोनं लुटलं’, पुण्यातील चोरटा राजस्थानात जेरबंद
पिंपरी चिंचवड शहरातील चिखली भागातील ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दसऱ्याच्या दिवशी तब्बल अडीच किलो वजनाचे सोने घेऊन पळ काढला होता
पिंपरी चिंचवड : दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात ‘सोने लुटण्याची’ परंपरा आहे. म्हणजेच आपट्याच्या झाडाच्या पानांची देवाणघेवाण करुन एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या जातात. परंतु पुण्यातील ज्वेलर्सच्या दुकानात एका कामगाराने खरेखुरे सोने लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सराफाकडील सोने लुटून नेणाऱ्या कामगाराला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर कामगाराने डल्ला मारला होता.
एक कोटी 18 लाखांच्या सोन्यावर डल्ला
पिंपरी चिंचवड शहरातील चिखली भागातील ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दसऱ्याच्या दिवशी तब्बल अडीच किलो वजनाचे सोने घेऊन पळ काढला होता. एक कोटी 18 लाख 66 हजार रुपये किमतीचे सोने या कामगाराने लुटून नेले होते. ही चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती.
राजास्थानातून आरोपीला अटक
त्या आधारे या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने राजस्थानमधून अटक केली. त्याच्याकडून एक कोटी 10 लाख दोन हजार 882 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मुकेश सोलंकी असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
हिडन कॅमेरावर पासवर्ड रेकॉर्ड, पंजाबच्या बारावी पास तरुणाचा पुण्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न
टोल भरण्यावरुन वाद, साताऱ्यात 12 ते 15 जणांची सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण
बालमित्रांना मृत्यूने एकत्र गाठलं, हिमालयातील दुर्घटनेत डोंबिवलीत दोन वृद्धांचा मृत्यू