महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवून बनावट माल रिटर्न, पिंपरीत भामट्यांकडून फ्लिपकार्टची 9 लाखांना फसवणूक

आरोपींनी 4 लाख 98 हजार रुपयांचे अॅपल एअरपॉड, 3 लाख 57 हजार 600 रुपयांचे एअरपॉड वायर चार्जर आणि 79 हजार 840 रुपयांचे वन प्लस कंपनीचे ब्लुटूथ हेडसेट मागवले. मात्र बनावट वस्तू परत करुन आरोपींनी कंपनीचा विश्वासघात केला

महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवून बनावट माल रिटर्न, पिंपरीत भामट्यांकडून फ्लिपकार्टची 9 लाखांना फसवणूक
वाकड पोलीस स्टेशन
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 3:57 PM

पिंपरी चिंचवड : फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीला पुण्यातील भामट्याने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर कालावधीत पिंपरी चिंचवड शहरातील आरोपीकडून कंपनीला तब्बल 9 लाख 35 हजार 440 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात एकून 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपींनी 4 लाख 98 हजार रुपयांचे अॅपल एअरपॉड, 3 लाख 57 हजार 600 रुपयांचे एअरपॉड वायर चार्जर आणि 79 हजार 840 रुपयांचे वन प्लस कंपनीचे ब्लुटूथ हेडसेट मागवले. मात्र बनावट वस्तू परत करुन आरोपींनी कंपनीचा विश्वासघात केला. अशाप्रकारे तब्बल 9 लाख 35 हजार 440 रुपयांची कंपनीची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.

कोण आहेत आरोपी?

आकुर्डीतील शंकर काटे चाळीत राहणारे 39 वर्षीय फिर्यादी गुलाब शंकर काटे यांनी तक्रार दाखल केली आहे. राजू भाई, अनिल रावत, रोहित सोनवणे, सौरभ जगदिश नामदेव यांच्यासह एकूण  25 जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मॅट्रिमोनियल साईटवरुन फसवणूक

दुसरीकडे, प्रसिद्ध मॅट्रिमोनियल साईटवर आकर्षक प्रोफाईल बनवत देशभरातील विवाहोच्छुक तरुणींची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील निगडी पोलिसांनी प्रेमराज थेवराज डिकृज या आरोपीला अटक केली. तो मूळ तामिळनाडूतील चेन्नईचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी प्रेमराज थेवराजने दोन-तीन महिने चिंचवडमधील एका उच्चशिक्षित तरुणीशी गप्पा मारुन ओळख वाढवली. तिचा विश्वास संपादन करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लाखो रुपये उकळले. आपल्याला पैशांची गरज असल्याचं सांगून त्याने तिच्याकडे बारा लाख रुपयांची मागणी केली.

संबंधित बातम्या :

साडीने गळा आवळून वडिलांची हत्या, आत्महत्येचा बनाव, हिंगोलीतील तरुणाचं बिंग आठ महिन्यांनी फुटलं

वडिलांवरील आंधळ्या विश्वासामुळे घात, बारा वर्षांच्या मुलासमोर आई-आजीसह तिघांची निर्घृण हत्या

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.