आई, पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन, सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात जावयाची आत्महत्या

पुण्यातील सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे याने रविवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास आयुष्य संपवलं. राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले होते.

आई, पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन, सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात जावयाची आत्महत्या
पुण्यात तरुणाची आत्महत्या
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 9:59 AM

पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. वर्षभरापूर्वीच तरुणाचं लग्न झालं होतं. तरुणाजवळ सुसाईड नोटही सापडली असून त्यात ‘आई, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन’ असं त्याने लिहिलं आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील शिवाजीनगर – गोखलेनगर भागातील सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे याने रविवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास आयुष्य संपवलं. राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले होते. त्यानंतर तिथे मृत्यू पत्र म्हणून चिठ्ठी सापडली होती.

सुसाईड नोटमध्ये काय?

सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सुसाईड नोटमध्ये केली आहे.

आईसाठी भावनिक संदेश

आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई, मी समजून माझ्या बाळाला संभाळ, त्याची काळजी घे असेही चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. निखिलचं एका वर्षापूर्वीच लग्न झालं होतं.

नागपुरातही विद्यार्थ्याची आत्महत्या

दुसरीकडे, मेरिटचा विद्यार्थी असलेल्या आणि नेहमीच दूरदर्शी विचार मांडणाऱ्या एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. प्रद्युम्न मयुरेश चेंडके (वय 19 वर्ष) असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. घरची मंडळी झोपल्यानंतर राहत्या घरातच त्याने आयुष्याची अखेर केली. नागपूर एमआयडीसीतील लक्ष्मी पार्क सूतगिरणी (वाघधरा) परिसरात ही घटना उघडकीस आली.

प्रद्युमनने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र चेंडके कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रद्युम्नच्या बहिणी शोकसागरात बुडाल्या आहेत. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

मोबाईल स्पीकरवर गाणं लावून राहत्या घरात गळफास, नाशकात 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या, पतीच्या तक्रारीवरून पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल

रक्षाबंधनालाच बहिणींच्या मनाला चटका, नागपुरात 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.