पुण्यात माजी आमदाराच्या पुतण्याच्या घरी चोरी, 100 तोळे सोन्यासह लाखोंची लूट

तिघे जण घरात शिरुन काही तासात 100 तोळे सोने आणि जवळपास चार लाखांची रक्कम घेऊन पसार झाल्याचे घराच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले.

पुण्यात माजी आमदाराच्या पुतण्याच्या घरी चोरी, 100 तोळे सोन्यासह लाखोंची लूट
पुण्यातील बंगल्यात चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 11:19 AM

पुणे : पुण्यातील संगमवाडी गावात माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या पुतण्यांच्या घरात जबरी चोरी झाली. हरिश्चंद्र मनोहर मोझे आणि मोहन मनोहर मोझे यांच्या घरातून तिघा चोरट्यांनी 100 तोळे सोने आणि चार लाख रुपयांची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेमुळे संगमवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हरिश्चंद्र मनोहर मोझे आणि मोहन मनोहर मोझे या दोघांचे कुटुंब बाहेरगावी फिरण्यास गेले होते. ते घरी आल्यावर घरातील वस्तू इतरत्र पडलेल्या दिसल्या. तसेच कपाटातील दागिने, पैसेही जागेवर नव्हते. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर मोझे कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. तिघे जण घरात शिरुन काही तासात 100 तोळे सोने आणि जवळपास चार लाखांची रक्कम घेऊन पसार झाल्याचे घराच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले.

पुण्याती हडपसरमध्ये बंगल्यात घरफोडी 

दरम्यान, पुण्यातील हडपसरसारख्या गजबजलेल्या भागातील बंगल्यात घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली होती. यामध्ये 88 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे. विवेक वसंतराव चोरघडे यांचा शेवाळ वाडीत बंगला आहे. त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे. 9 ऑगस्टला विवेक चोरघडे आपल्या कुटुंबीयांसह दक्षिण भारत फिरायला गेले होते. 19 ऑगस्टला ते पुण्यात परतले. तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं. त्यात जवळपास 155 तोळे सोनं, 2 किलो चांदी, साडेसहा लाख रुपयांचे विदेशी चलन आणि 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

लोणावळ्यात डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा

दुसरीकडे, लोणवळ्यात वरिष्ठ डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा पडल्याचा धक्कादायक जून महिन्यात समोर आला होता. डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून हात-पाय बांधून सहा दरोडेखोरांनी चोरी केली होती. दरोडेखोर दोरखंडाने खाली येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यानंतर महिनाभराने पोलिसांनी मुंबईसह मध्य प्रदेशातून १५ जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या.

पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल राहतात. दरोडेखोरांनी खंडेलवाल दाम्पत्याच्या घरात प्रवेश करुन त्यांचे हात-पाय बांधले आणि सशस्त्र दरोडा टाकला होता. आरोपी मुंबईतील फिल्मसिटीमध्ये काम करणारे मजूर असल्याचं समोर आलं होतं. त्यांच्याकडून तीस लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

पुण्यात हडपसरमध्ये बंगल्यात चोरी, 155 तोळे सोन्यासह 88 लाखांचा ऐवज चोरीला

वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा, निघताना पाया पडून चोरांनी 500 ​​रुपये दिले, म्हणाले सहा महिन्यांत सगळा ऐवज परत करु

CCTV VIDEO | लोणवळ्यात डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा, दाम्पत्याला बांधून 66 लाखांची लूट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.