Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyber Crime : सायबर गुन्हेगारी वाढली, महाराष्ट्र शासनाने दिले लक्ष, आता 24 तास मिळणार अशी सुविधा

Pune Cyber Crime : राज्यात सायबर क्राईमच्या घटना वाढल्या आहेत. सायबर विभागाकडे रोज फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल होत आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांची झालेल्या फसवणुकीचा तपास लवकर लागणार आहे.

Cyber Crime : सायबर गुन्हेगारी वाढली, महाराष्ट्र शासनाने दिले लक्ष, आता 24 तास मिळणार अशी सुविधा
cyber crimeImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 11:32 AM

पुणे | 7 सप्टेंबर 2023 : सायबर गुन्हेगार फसवणुकीचे अनेक फंडे वापरुन ऑनलाईन फसवणूक करतात. राज्यात सर्वच ठिकाणी यासंदर्भातील गुन्हे दाखल केले जात आहेत. त्या तक्रारी वाढत आहेत. पुणे शहरात अनेक उच्चशिक्षित लोकांची फसवणूक झाली आहे. केव्हा पार्ट टाईम जॉबचे लालच दाखवून फसवणूक केली जाते. कधी एखाद्या लिंकवर क्लिक करुन बँक खाते रिकाम केले जाते. काहीतरी कारण सांगून ओटीपी विचारुन फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या प्रकरणातील गुन्ह्यांचा तपास लागण्याचे प्रमाण कमी आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे.

काय करणार राज्य शासन

राज्य शासनाने 837 कोटी रुपये मंजूर केले आहे. सायबर सुरक्षा प्रकल्पावर काम या निधीतून करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. आता सायबर फसवणुकीच्या तक्रारी 24X7 नोंदवता येईल. त्यासाठी एक कॉल सेंटर तयार केले जाणार आहे. तसेच या तक्रारींचा तपास करण्यासाठी प्रगत सायबर तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामुळे गुन्ह्यांचा तपास लागून गुन्हेगारांना शिक्षा होण्यास मदत मिळेल. आता सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून व्हर्च्युअल गुन्ह्यांचा तपास केला जाणार आहे.

सध्याचे तंत्रज्ञान कालबाह्य, यामुळे हा बदल होणार

सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सध्याचे तंत्रज्ञान कालबाह्य ठरत आहे. यामुळे अत्याधुनिक साधने वापरुन तंत्रज्ञान प्रगत केला जाणार आहे. गृह विभागाने प्रगत तंत्रज्ञानासोबत कुशल कर्मचारी तयार करण्याचा उद्देश ठेवला आहे. त्यासाठी कमांड आणि कंट्रोल सेंटर, क्लाउड-आधारित डेटा सेंटर आणि सुरक्षा ऑपरेशन्स अशा तंत्राचे एकत्रीकरण समाविष्ट आहे.

हे सुद्धा वाचा

मोबाईल ॲपची निर्मिती करणार

सध्या राज्यभरातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये सायबर पोलीस सेल आहे. आता राज्यभरातील सर्व सायबर पोलीस ठाण्यांमधील कनेक्टिव्हिटी चांगली करता येणार आहे. सायबर गुन्ह्यांशी संबंधित तक्रारीसाठी 24/7 कॉल सेंटर करण्यासोबत एक मोबाइल ॲप तयार केला जाणार आहे. त्यामाध्यमातून आपल्या तक्रारी नोंदवता येणार आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.