पुणे पोलिसांच्या ‘सुरक्षित रिक्षा’ स्पर्धेला ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचं प्रत्युत्तर, थेट एक कोटींचं बक्षीस

लष्कर पोलीस स्टेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेचा निषेध म्हणून "पोलीस ठाणे, प्रामाणिक पोलीस ठाणे" अशी विडंबनात्मक स्पर्धा "बघतोय रिक्षावाला फोरम" राबवत आहे.

पुणे पोलिसांच्या 'सुरक्षित रिक्षा' स्पर्धेला 'बघतोय रिक्षावाला' संघटनेचं प्रत्युत्तर, थेट एक कोटींचं बक्षीस
पुण्यात रिक्षावाला संघटना आणि पोलिसांमध्ये चढाओढ
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 11:18 AM

पुणे : लष्कर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील रिक्षा चालकांसाठी ‘रिक्षा सुरक्षित रिक्षा 2021′ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहरात मागील काही दिवसात रिक्षा चालकांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांकडे वेगळ्या दृष्टीने पाहू नये, यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांच्या स्पर्धेला प्रत्युत्तर म्हणून रिक्षावाला संघटनेकडून पोलिसांसाठीच तब्बल एक कोटी रुपये बक्षीस असणारी अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

रिक्षा संघटनेकडून विडंबनात्मक स्पर्धा

लष्कर पोलीस स्टेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेचा निषेध म्हणून “पोलीस ठाणे, प्रामाणिक पोलीस ठाणे” अशी विडंबनात्मक स्पर्धा “बघतोय रिक्षावाला फोरम” राबवत आहे. ज्या पोलिस ठाण्यांमध्ये फायनान्स कंपन्यांच्या गुंडागर्दी विरोधात तक्रारी दाखल झाल्या असतील, त्या पोलिस ठाण्यांचा गौरव आम्ही करणार आहोत, असं संघटनेचे अध्यक्ष डॉ केशव क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

कायदे मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. मात्र पुणे पोलीस रिक्षावाल्यांची स्पर्धा घेऊन रिक्षावाल्यांची प्रतिमा मलीन करत असल्याचा आरोप रिक्षा संघटनेने केला आहे. पुणे पोलिसांनी फायनान्स कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आम्ही वेळोवेळी केलेली आहे. माहितीच्या अधिकारात पुणे पोलीस आयुक्त आणि पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालयाने माहिती दिली आहे. फायनान्स कंपनीविरुद्ध गुन्हा का दाखल करत नाही, म्हणून ही स्पर्धा आम्हाला घ्यावी लागली आहे, असं बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ केशव क्षीरसागर यांनी विचारलं

पुणे पोलिसांची रिक्षा स्पर्धा नेमकी काय आहे?

प्रथम पारितोषिक रु 11,000 आणि प्रमाणपत्र द्वितीय पारितोषिक रु. 5,000 आणि प्रमाणपत्र तृतीय पारितोषिक रु. 3,000 आणि प्रमाणपत्र 5 बक्षिसे प्रत्येकी रु. 1,000 आणि प्रमाणपत्र 10 उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी 500 रुपये आणि प्रमाणपत्र

‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचं स्पर्धेचे स्वरूप आणि बक्षीस

उपमुख्यमंत्री प्रामाणिक पोलिस ठाणे चषक – बक्षीस स्वरूप एक कोटी रुपये पोलीस चौकी यांनी सहभागी होण्याचे आव्हान ज्या पोलिस चौकी यांना भाग घ्यायचा आहे त्या ठाण्यामध्ये कमीत कमी एक केस 21 ऑगस्ट 2020 ते 21 ऑगस्ट 2021 पर्यंत फायनान्स कंपन्यांच्या गुंडा विरोधात नोंदली गेलेली असावी

संबंधित बातम्या :

पुण्यात रिक्षा चालकाला मारहाण, फायनान्स कंपनी वसुली एजंटने मारल्याचा आरोप

Video: दूध चोरीसाठी पुण्यात भलताच फंडा, रिक्षातून येणाऱ्या चोरट्याकडून साडे पाचशे लिटर दूध लंपास

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.