Pune Building Slab Collapse Live : पुणे स्लॅब कोसळून दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

| Updated on: Feb 04, 2022 | 2:43 PM

मॉलच्या तळ मजल्याचे काम सुरु असताना रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. स्लॅब टाकण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, शिवाय सुरक्षेचे नियम पाळले गेले नाहीत, अशी माहितीही पोलीस उपायुक्तांनी दिली.

Pune Building Slab Collapse Live : पुणे स्लॅब कोसळून दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
पुण्यात स्लॅब कोसळून मजुरांचा मृत्यू
Follow us on

पुणे : पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब (Pune Building Slab Collapse) कोसळून गुरुवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकून पाच कामगारांना (Labors Death) जागीच प्राण गमवावे लागले, तर किमान पाच कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्व कामगार परराज्यातील असल्याचं येरवडा पोलिसांनी सांगितलं. मॉलच्या तळ मजल्याचे काम सुरु असताना रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे. तर फारुक वाडिया यांची ही जमीन असून अहलुवालिया यांची साईट असल्याचा दावा राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी केला आहे. आगामी अधिवेशनात कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात मुद्दा उपस्थित करणार असल्याचंही टिंगरे म्हणाले.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Feb 2022 07:54 AM (IST)

    पुणे स्लॅब कोसळून दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

    पुण्यातील एका बांधकामग्रस्त इमारतीत झालेल्या दुर्घटनेने अतीव दुःख झाले. शोकाकुल कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. मला आशा आहे की या दुर्घटनेत जखमी झालेले सर्व जण लवकरात लवकर बरे होतील : पंतप्रधान नरेंद्र मोदी

     

  • 04 Feb 2022 07:40 AM (IST)

    VIDEO | पुण्यातील शास्त्रीनगर परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळला, 5 जणांचा मृत्यू

  • 04 Feb 2022 07:40 AM (IST)

    पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य

  • 04 Feb 2022 07:39 AM (IST)

    5 जणांचा जीव घेणारी घटना नेमकी कशी घडली? जमीन कुणाची? साईट कुणाची? सुरक्षा नियमांचे तीन तेरा?

  • 04 Feb 2022 07:38 AM (IST)

    फारुक वाडियांची जमीन, अधिवेशनात मुद्दा मांडणार, राष्ट्रवादीचा आमदार आक्रमक

    – आगामी अधिवेशनात कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात मुद्दा उपस्थित करणार,

    – फारूक वाडिया यांची जमीन असून अहलूवालिया यांची साईट आहे,

    – मॉलचे काम असून तळमजल्याचा स्लॅब कोसळून घटना घडलीय,

    – यासंदर्भात गुन्हा दाखल होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे

    – पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे आक्रमक

  • 04 Feb 2022 07:38 AM (IST)

    स्लॅब कोसळून दुर्घटने प्रकरणी गुन्हा दाखल होणार

    – मॉलच्या तळमजल्याचे काम सुरू असताना रात्री 10.45 वाजता घटना घडली

    – या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी आहेत,

    – यासंदर्भात लवकरच गुन्हा दाखल केला जाणार आहे,

    – काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, शिवाय सुरक्षेचे नियम पाळले गेले नाहीत

    – पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांची माहिती

  • 04 Feb 2022 07:33 AM (IST)

    पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून पाच मजूर ठार

    पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब (Pune Building Slab Collapse) कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास घडली. इमारतीच्या स्लॅबच्या जाळ्यांमध्ये अडकून पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 कामगार गंभीर जखमी झाले आहेत.