तिघे अल्पवयीन, दारु पिण्यास बसले, त्यानंतर जे घडले तो व्हिडिओ स्टेटस ठेवला

Pune Crime News | तीन अल्पवयीन मुले दारु पित बसले होते. त्यानंतर त्यांच्यात किरकोळ वाद झाला. मग त्या वादातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड मारला. त्याची हत्या केली. त्याचा व्हिडिओ बनवून स्टेट्स ठेवला. या हत्येचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तिघे अल्पवयीन, दारु पिण्यास बसले, त्यानंतर जे घडले तो व्हिडिओ स्टेटस ठेवला
instagram and social media
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 1:18 PM

रणजित जाधव, चाकण, पुणे, दि. 27 फेब्रुवारी 2024 | पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. तीन अल्पवयीन मुले शहरातील एका मोकळ्या जागेत मद्यपान करण्यासाठी बसले होते. त्यापैकी हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे आणि आरोपीच्या मित्राचे किरकोळ वाद झाले होते. यातून हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाने आरोपीच्या मित्राच्या कानशिलात लगावली. त्यानंतर धक्कादायक प्रकार घडला. या प्रकाराच्या रागामुळे संतापलेल्या एका आरोपीने त्याच्या डोक्यात दगड मारून हत्या केली. आरोपी या ठिकाणीच थांबले नाही. त्यांनी या प्रकाराचा व्हिडिओ बनवला. तो सोशल मीडियावर शेअर केला.

काय घडला प्रकार

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. पुणे पोलिसांकडून ही गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यानंतरही कोयते हल्ले, रस्त्यांवर हल्ले, चोरी, दरोडो आणि मारहाण असे प्रकार घडत आहे. तीन अल्पवयीन मुले दारु पित बसले होते. त्यानंतर त्यांच्यात किरकोळ वाद झाला. मग त्या वादातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड मारला. त्याची हत्या केली. त्याचा व्हिडिओ बनवून स्टेट्स ठेवला. या हत्येचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अल्पवयीन मुलांमधील ही क्रूरता पाहून पिंपरी चिंचवड पोलिसांना धक्का बसला आहे.

काय आहे व्हिडिओत

ज्याच्यासोबत दारु पित बसला त्याची हत्या केली. त्याचा व्हिडिओ दोघांनी बनवला. या व्हिडिओमध्ये एक जण दुसऱ्या डोक्यावर दगड मारताना दिसत आहे. या घटनेच्या व्हिडिओचे इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेवण्याची हिंमत आरोपींनी दाखवली. या प्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेलं आहे. या हत्याप्रकरणातील आरोपी 17 वर्षीय आहेत. हत्या झालेल्या आणि हत्या करणाऱ्या दोघांवर याआधी गंभीर गुन्हे दाखल आहेत. हत्या झालेल्या मुलावर हत्येप्रकरणी यापूर्वी गुन्हा दाखल होता. ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांना चाकण पोलिसांनी अटक केलीय.

अभिनेते रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर पुण्यातील वेताळ टेकडीवर ड्रग्स सेवन करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचा व्हिडिओ टाकला होता. त्याला दोन दिवस झाले नाही त्यानंतर अल्पवयीन मुलींनी हत्या केली आहे. यामुळे पुण्यात खळबळ माजली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.