कुणाची दाढी वाढलेली… कुणाचं पोट सुटलेलं.. कुणाला टक्कल तर कुणाला… पुण्यात अट्टल गुंडांची परेड

अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अत्यंत सक्रिय झाले आहेत. पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी अमितेश कुमार यांनी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी पुण्यातील सर्व गुंडांना पोलीस मुख्यालयात आज बोलावलं. या सर्वांची परेड करण्यात आली. त्यांना पोलिसांनी सूचना केल्या आणि तंबीही दिल्याचं सांगितलं जात आहे.

कुणाची दाढी वाढलेली... कुणाचं पोट सुटलेलं.. कुणाला टक्कल तर कुणाला... पुण्यात अट्टल गुंडांची परेड
criminal Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 5:45 PM

पुणे | 6 फेब्रुवारी 2024 : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. दिवसाढवळ्या खून, बलात्कारसारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे पुणे शहर हादरून गेलं आहे. पुण्यातील नागरिकही या गुन्हेगारीमुळे भयभीत झाले आहेत. शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर तर एकदमच खळबळ उडाली. त्यामुळे राज्य सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली. अमितेश कुमार यांच्याकडे पुण्याच्या आयुक्तपदाचा भार दिला. सूत्रे हाती घेताच अमितेश कुमार अॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी शहरातील सर्वच गुंडांना पोलीस मुख्यालयात बोलावलं. त्यांची परेडच करण्यात आली.

अमितेश कुमार यांनी शहरातील जवळपास 300 हून अधिक गुंडांना एकसाथ पोलीस मुख्यालयात बोलावलं. यातील काही सराईत गुंडं होते. काही अट्टल गुन्हेगार होते तर काही भुरटे चोरही होते. काही गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार होते, तर काही तडीपार गुंडंही होते. या सर्वांचं परेड करण्यात आली. यावेळी प्रत्येक गुंडाची देहबोली पाहण्यासारखी होती. कुणाची दाढी वाढलेली होती. कुणाचं पोट सुटलेलं होतं, कुणाला टक्कल पडलेलं होतं. तर कुणाला चष्मा लागलेला होता. काहींचं वय झालं होतं. तर काही वयात आलेले होते. कुणी थकलेला होता, तर कुणाच्या नजरेत जरब होती. तर कोण मिशिला पीळ देत होता. पण पोलीस आयुक्तांनी बोलावल्यानंतर बरेच गुंड मानखाली घालून शांतपणे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उभे होते.

शाळेतील विद्यार्थ्यांसारखे…

यातील अनेक गुंडांनी पुणेकरांच्या नाकीनऊ आणले आहेत. काहींनी तर पुण्याच्या बाहेरही गुन्हे केलेले आहेत. यातील काही गुंड तर अत्यंत खतरनाक आहेत. पण हे सर्व गुंड पोलीस ठाण्याच्या परिसरात शिस्तीने उभे होते. खाली मान घालून, दोन्ही हात जोडून उभे होते. तर कुणी हाताची घडी घालून उभे होते. शाळेतील एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा केल्यानंतर तो ज्या पद्धतीने उभा राहतो, तशाच प्रकारे अज्ञाधारकपणे हे गुंड उभे होते.

कोण कोण आलं?

आज एकूण 300 गुंडांची परेड झाली. त्यात गजा मारणे, बाबा बोडके ,निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांनी पोलीस मुख्यालयात हजेरी लावली होती. या सर्वांचे नाव, गाव विचारलं गेलं. सध्या कुठे राहतात, काय करतात याची माहितीही घेण्यात आल्याचं सांगितलं गेलं. यावेळी पोलीस मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच या गुन्हेगारांना गुन्हे केले तर याद राखा, अशी तंबी देण्यात आल्याचं सांगण्यात येतं. तसेच त्यांना शहरात शांतता ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.