Video : चार शस्त्रधारी चोर एका महिलेला भ्यायले, महिला अंगावर धावून येताच पळत सुटले; सीसीटीव्हीत थरार कैद

आपल्या मुलावर व आपल्या कुटुंबावर आलेले संकट परतून लावण्याचा प्रयत्न या महिलेने केला. यावेळी या महिलेला चोर चाकूचा धाक दाखवत असतानाही तिने कसलीही भीती न बाळगता महिलेने या चोरांच्या अंगावरती धावून गेली. शस्त्रधारी चार चोरट्यांनी तिचा रुद्र अवतार पाहता घटनास्थळावरून लागलीच पळ काढला.

Video : चार शस्त्रधारी चोर एका महिलेला भ्यायले, महिला अंगावर धावून येताच पळत सुटले; सीसीटीव्हीत थरार कैद
मातेचा रुद्रावतार... चार सशस्त्र चोरट्यांचा एकटीनेच केला मुकाबला!Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 8:58 PM

इंदापूर : “चोरट्यांनी मला मारले असते तर चालेल असते, मात्र माझ्या छोट्या मुलाला मारता कामा नये” याच हेतूने त्या आई (Mother)ने आपल्या मुलाच्या रक्षणासाठी शस्त्रधारी चार चोरट्यां (Thieves)ना प्रतिकार करत त्यांना पळवून लावल्याची घटना इंदापूर शहरात घडली आहे. विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाली आहे. इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर हायवे लगत असणाऱ्या काझी फर्निचर शेजारी सादिक शेख यांची जागा आहे. या जागेवरती उत्तर प्रदेशातील एक कुटुंब व काही लोक पुठ्याचा व्यवसाय करतात. या ठिकाणी त्यांनी छोटेसे पत्र्याचे शेड राहण्यासाठी उभारले आहे. याठिकाणी धर्मराज कश्यप, त्याची पत्नी नीलम कश्यप आणि त्यांचा मुलगा राहतात. त्यांच्या शेजारी काही त्यांचे नातलगही राहत आहेत.

चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत महिलेवर हल्ला चढवला

दोन दिवसा पूर्वी 3 जून रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चार शस्त्रधारी चोर या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. चोरट्यांनी यावेळी कश्यप यांच्या पत्र्याच्या शेडचा समोरील पुठ्ठा काढून बाजूला टाकला व घरात शिरणार होते. मात्र यावेळी घरातील ही महिला जागीच होती. ती आपल्या छोट्या मुलाला दूध पाजत होती. चोर आपल्या घरात शिरत आहेत. ते आता आपल्या वरती व आपल्या मुलावर ती हल्ला करून चोरी करतील या भीतीने मुलाला काही होता कामा नये, म्हणून चोरट्यांना प्रतिकार करण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी पहिल्यांदा चाकूचा धाक दाखवत त्या महिलेवर हल्ला चढवला.

महिलेचा रुद्रावतार पाहून चोरटे पसार

आपल्या मुलावर व आपल्या कुटुंबावर आलेले संकट परतून लावण्याचा प्रयत्न या महिलेने केला. यावेळी या महिलेला चोर चाकूचा धाक दाखवत असतानाही तिने कसलीही भीती न बाळगता महिलेने या चोरांच्या अंगावरती धावून गेली. शस्त्रधारी चार चोरट्यांनी तिचा रुद्र अवतार पाहता घटनास्थळावरून लागलीच पळ काढला. यावेळी महिला देखील चोरांच्या पाठीमागे धावली. यावेळी तिच्या मागे तिचा पतीही त्या चोरट्यांना दिशेने पाठलाग करीत पुढे गेला. मात्र चोर अंधाराचा फायदा घेत तेथून पळून गेले. विशेष बाब म्हणजे ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यासंदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून इंदापूर पोलिसांनी या महिलेचे कौतुक केले आहे. (mother fight with four armed thieves in Indapur, incident captured on CCTV)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.