Murder | वाद छोटा, कांड मोठा! दारुसाठी 20 रुपये दिले नाहीत म्हणून चक्क जीवच घेतला

खेड घाट परिसरातून तो पळून जाण्याच्या इराद्याच असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. नितीन घरातून फोन बंद करुन फरार झाला होता आणि लपून बसला होता. पोलिसांनी नितीनचा शोध घेण्यासाठी आजुबाजूच्या गावांमध्ये पथकं तैनात केली होती.

Murder | वाद छोटा, कांड मोठा! दारुसाठी 20 रुपये दिले नाहीत म्हणून चक्क जीवच घेतला
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 3:25 PM

पुणे : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारुसाठी (Liquor) 20 रुपये (Rupee) दिले नाहीत म्हणून चक्का एकाचा खून (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune) घडली आहे. पुण्यातील राजगुरुनगर (Rajgurunagar) इथं घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. एकाची हत्या करण्यासोबत एकावर प्राणघातक हल्लाही (Attack) करण्यात आल्याचं समोर आलंय. या हत्येप्रकरणी पोलिसांनी (Police) मुख्य संशयिताला अटकही केली आहे.

काय नेमकं प्रकरण?

नितीन काळुराम काशिद नावाच्या इसमानं दारु पिण्यासाठी एकाकडे 20 रुपये मागितले होते. ते दिले नाहीत म्हणून नितीननं रागाच्या भरात एकाचा जीव घेतलाय. इतकंच काय तर त्यानं एकावर जीवघेणा हल्लाही केला होता. यानंतर फरार असलेल्या नितीनच्या मागावर अनेक दिवसांपासून पोलीस होते. राजगुरुनगरमध्ये घडलेल्या या हत्याकांडानंतर नितीन गायब झाला होता.

खेड घाट परिसरातून तो पळून जाण्याच्या इराद्याच असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. नितीन घरातून फोन बंद करुन फरार झाला होता आणि लपून बसला होता. पोलिसांनी नितीनचा शोध घेण्यासाठी आजुबाजूच्या गावांमध्ये पथकं तैनात केली होती. स्थानिकांकडूनही पोलीस माहिती मिळवण्याच्या प्रयत्ना होता. अशातच खेड घाट परिसरातून नितीन पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनीही सापळा रचला आणि अखेर मोठ्या शिताफीनं नितीनच्या मुसक्या आवळल्यात. नितीन हा मूळचा खरपुडी बुद्रुक येथील असून संताप अनावर झाल्यानं त्यानं हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Pune Murder

वाद छोटा, कांड मोठा!

अखेर खेड पोलिसांना या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपीला गजाआड करण्यात यश आलंय. पोलीस आता माथेफिरु कृत्य करणाऱ्या नितीनची कसून चौकशी करत असून त्यातून अधिक उलगडे होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच शुल्लक कारणातून जीवघेणे प्रकार वाढल्याचीही बाब यानिमित्तानं अधोरेखित झाली आहे. किरकोळ कारणावरुन संतावर अनावर होऊन जीव घेण्याची वृत्ती बळावत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे.

इतर बातम्या – 

सांगवीतील काटेपुरम चौकात भरदिवसा गोळीबार; एक जखमी, हल्लेखोर पसार

वीजबिलाच्या पैशांवरून वाद, घरमालकाने केली भाडेकरूची हत्या; पत्नीवरही केला प्राणघातक हल्ला

वाढदिवशीच अमिरला संपवण्याचा होता कट! कट फसून 12 तासांत 12 जणांना अटक

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.