पुण्यात अजित पवार गटातील माजी नगरसेवकाची पिस्तूल लोड करत गोळीबार, कारण समजल्यावर पोलीस हैराण

Pune Crime News: गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वाकड पोलिसांनी सचिन नढे आणि विनोद नढे या दोघांना अटक केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या सुरक्षेतेसाठी विनोद नढे यांनी हे पिस्तूल घेतले आहे.

पुण्यात अजित पवार गटातील माजी नगरसेवकाची पिस्तूल लोड करत गोळीबार, कारण समजल्यावर पोलीस हैराण
पुण्यात गोळीबार
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 1:34 PM

पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. कोयता हल्ले, गोळीबार हे प्रकार पुण्यात अधूनमधून होत असतात. यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यानंतर गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश येत नाही. आता पुण्यातील गोळीबाराचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात अजित पवार गटातील माजी नगरसेवकाकडे पिस्तूल होते. ते पिस्तूल लोड करत चुलत भावाने गोळीबार केला. या गोळीबाराचे कारण समज्यावर पोलिसांनाही धक्का बसला.

काय घडला प्रकार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाचे विनोद नढे माजी नगरसेवक आहेत. विनोद नढे आणि त्यांचा चुलत भाऊ सचिन नढे हे दोघे राहुल बार अँड खुशबू हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर मद्यपान करत बसले होते. त्याच दरम्यान विनोद नढे यांना त्यांच्या चुलत्याचा फोन आला. कशाला फिरतो काळजी घेत जा? असा सल्ला चुलत्याने दिला. त्यावर विनोद नढे यांनी सांगितले की, काळजी करु नको, माझ्याकडे सुरक्षेसाठी पिस्तूल आहे.

विनोद नढे याचा संवाद ऐकून चुलत भाऊ सचिन नढे याने गंमतीत म्हटले, खरंच तुझ्याकडे पिस्तूल आहे का? मग त्यानंतर विनोद नढे याने पिस्तूल काढून दाखवली. त्यानंतर सचिन नढे याने पिस्तूल लोड करून थेट गोळीबार केला. ती गोळी प्लेट ठेवायचा कपटावर लागली. सुदैव चांगले होते की, ही गोळी शेजारी बसलेल्या व्यक्तीला लागली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. पोलिसांना हे कारण समजल्यावर धक्का बसला.

हे सुद्धा वाचा

गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वाकड पोलिसांनी सचिन नढे आणि विनोद नढे या दोघांना अटक केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या सुरक्षेतेसाठी विनोद नढे यांनी हे पिस्तूल घेतले आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.