पुणे | 7 नोव्हेंबर 2023 : पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हे आरोपपत्र दाखल केले आहे. पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर पुणे शहरातील इसिस मॉड्यूलचा धक्कादायक खुलासा झाला होता. या प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) देण्यात आला. त्यानंतर एनआयएकडून या प्रकरणात सात जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनआयएने विशेष न्यायालयात स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्र कायदा आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
एनआयएनने मोहम्मद इमरान, मोहम्मद याकूब साकी, अब्दुल कदीर, नसीरुद्दीन काजी, जुल्फिकार अली, शमील साकिब नाचन आणि आकिफ अतीक नाचन या सात आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यातील दोन आरोपी मध्य प्रदेशातील तर पाच आरोपी महाराष्ट्रातील आहेत. या आरोपींना इसिससाठी काम केले. देशात दहशतवाद माजवण्याचा त्यांचा कट होता. देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेला धोका निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांना विदेशातून पैसे मिळत होते.
दशतवाद्यांनी दशतवादी तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबीर घेतले होते. त्यांनी अनेक अतिरेकी तयार करण्याचा प्रयत्न केला. आयईडी बनवण्यासाठी त्यांनी सामान एकत्र केले. लोकांमध्ये दहशत माजवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी जंगलामध्ये बॉम्बस्फोटाची चाचणीही केली होती. आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. त्यांना विदेशातून पैसा मिळाला. इसिसच्या इशाऱ्यावर हे सात जण काम करत होते. त्यासाठी त्यांनी नेटवर्क तयार केले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा या राज्यात त्यांनी सर्च ऑपरेशन केले होते.