Pune Crime : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची नागपूर कारागृहातून सुटका
तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या साथीदारांनी तळोजा जेल ते पुणे अशी 300 गाड्यांसह मिरवणूक काढली होती. तसेच उर्से टोल नाक्यावर फटाके फोडत आरडाओरडा करत या सर्वाचे ड्रोन शूटही केले होते. याच मिरवणुकीमुळे गजा मारणेला पुन्हा तुरुंगवारी करावी लागली.
पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रॅली काढल्याप्रकरणी नागपूर कारागृहात स्थानबद्ध असलेल्या पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marane)ची कारागृहातून सुटका (Released) झाली आहे. गजा मारणेला एमपीडीए कायद्यान्वये एक वर्ष स्थानबद्ध करण्यात आलं होतं. वर्षभरानंतर गजा मारणेची सुटका झाली आहे. तब्बल 8 वर्षानंतर गजानन मारणे हा तुरुंगाबाहेर असणार आहे. गजानन मारणे याच्या काढलेल्या रॅलीमधील बहुतांश गुंडावर पुणे पोलिसांनी कारवाई केलीये. त्यामुळे आता गजा मारणेवर पुणे पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Notorious goon Gaja Marane from Pune released from Nagpur Jail)
गेल्या वर्षी तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर काढली होती मिरवणूक
गजा उर्फ गजानन मारणे हा पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या असून कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. 2014 मधील दोन हत्या प्रकरणात गजा मारणे सात वर्ष तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. गेल्या वर्षी या हत्येच्या गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. यानंतर तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या साथीदारांनी तळोजा जेल ते पुणे अशी 300 गाड्यांसह मिरवणूक काढली होती. तसेच उर्से टोल नाक्यावर फटाके फोडत आरडाओरडा करत या सर्वाचे ड्रोन शूटही केले होते. याच मिरवणुकीमुळे गजा मारणेला पुन्हा तुरुंगवारी करावी लागली.
साताऱ्यातून पोलिसांनी केली होती अटक
मिरवणूक काढणे, उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे, फूड मॉलमधील वस्तू जबरदस्तीने उचलणे या प्रकरणी गजासह त्याच्या 150 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गजा मारणे फरार झाला होता. पोलिसांना गुंगारा देऊन मारणे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात लपून बसला होता. अखेर 6 मार्च 2021 रोजी साताऱ्यातील जावळी तालुक्यातून गजाला अटक करण्यात आली. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यानंतर वर्षभरानंतर आता नागपूर कारागृहातून त्याची सुटका झाली आहे. (Notorious goon Gaja Marane from Pune released from Nagpur Jail)
इतर बातम्या
Kalyan Crime : रेल्वे ठेकेदाराकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
Mumbai Crime : अंधेरीतील डान्सबारवर पोलिसांच्या एसएस शाखेचा छापा, 18 मुली ताब्यात