Pune crime | बनावट परीक्षार्थी बनून भावाची SRPF ची लेखी परीक्षा देताना एकाला अटक
रविवारी SRPF ची लेखी परीक्षा होती. हडपसर येथील एस एम जोशी कॉलेजमध्ये या परीक्षेचे केंद्र होते. या केंद्रावर संबंधित आरोपी परीक्षा देण्यासाठी आला होता. मात्र तो स्वतः:चा नव्हे तर भावाचा पेपर देण्यासाठी आला होता. परीक्षेच्या दरम्यान आरोपी ब्लू टूथचा वापर करण्याचा प्रयत्न करता होता.याच दम्यान उपस्थित सुपरव्हिजन करणाऱ्या शिक्षकाला त्याच्या हालचाली संशयस्पद वाटल्या.
पुणे – म्हाडा भरती परीक्षेचा रद्द झाल्याच्या गोंधळ सुरु असताना SRPF च्या लेखी परीक्षेत भावाचा पेपर देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुण भावाच्या जागेवर त्याचा पेपर देण्यासाठी आला होता. टुथद्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न करताना ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्याने ही घटना उघड झाली. हडपसर पोलिसांनी अंबाधित आरोपीला अटक केली आहे. विशाल गबरुसिंग बहुरे ( जोडवाडी, औरंगाबाद) या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच भरतसिंग गबरुसिंग बहुरे (रा. जोडवाडी, औरंगाबाद) या मूळ परीक्षार्थीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी पकडली चोरी
रविवारी SRPF ची लेखी परीक्षा होती. हडपसर येथील एस एम जोशी कॉलेजमध्ये या परीक्षेचे केंद्र होते. या केंद्रावर संबंधित आरोपी परीक्षा देण्यासाठी आला होता. मात्र तो स्वतः:चा नव्हे तर भावाचा पेपर देण्यासाठी आला होता. परीक्षेच्या दरम्यान आरोपी ब्लू टूथचा वापर करण्याचा प्रयत्न करता होता.याच दम्यान उपस्थित सुपरव्हिजन करणाऱ्या शिक्षकाला त्याच्या हालचाली संशयस्पद वाटल्या. त्यावेळी त्याच्याकडं चौकशी केली असताना पेपर लिहण्यासाठी तोब्लु टूथचा वापर करता असल्याचे समोर आले. त्याच्याकडे अधिकचौकशी केल्यानंतर भावाच्या जागी पेपर देता असल्याचे समोर आले.
म्हाडा पेपर फुटीत 6 जणांना अटक म्हाडाच्या भरती परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना अटक केली आहे. यामध्य्ये तीन जणांना पुण्यातून तर तीन जणांना औरंगाबद्द येथून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये खासगी क्लासचालकांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे. परीक्षा असा अचानक रद्द झाल्याने परीक्षार्थीनी शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
PM KISAN YOJNA : अगोदर ही प्रक्रिया पूर्ण करा, तरच मिळणार पीएम किसान निधी योजनेचा 10 हप्ता
Aurangabad: मनसेच्या होर्डिंगवर ‘जय श्रीराम’, उद्याच्या राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शहरभर बॅनरबाजी!