व्हेल माशाची एक कोटीची उलटी पिंपरी पोलिसांकडून जप्त, दोन आरोपी अटकेत

आरोपी अजित आणि मनोज यांनी व्हेल माशाची उलटी जॉनला कुरिअरने पाठवण्यात आली होती. जॉन ही उलटी बेकायदेशीररित्या बाजारात विकणार होता. ही उलटी घेण्यासाठी आरोपी जॉन मोशी टोलनाक्याजवळ येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एका सदस्याला खबऱ्याकडून मिळाली.

व्हेल माशाची एक कोटीची उलटी पिंपरी पोलिसांकडून जप्त, दोन आरोपी अटकेत
व्हेल माशाची एक कोटीची उलटी पिंपरी पोलिसांकडून जप्त
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 11:09 PM

पिंपरी : तस्करीसाठी आलेली व्हेल माशाची सुमारे 1 कोटी 10 लाख रुपये किंमतीची उलटी(Ambergris) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. व्हेल माशाची ही उलटी(Ambergris) कुरिअरने पाठवण्यात आली होती. मात्र तस्करी करण्याआधीच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केली. याप्रकरणी एकूण तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील करीत आहेत.

पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली

जॉन सुनील साठे आणि अजित हुकूमचंद बागमार, मनोज अली अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, यापैकी जॉन आणि अजित यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी अजित आणि मनोज यांनी व्हेल माशाची उलटी जॉनला कुरिअरने पाठवण्यात आली होती. जॉन ही उलटी बेकायदेशीररित्या बाजारात विकणार होता. ही उलटी घेण्यासाठी आरोपी जॉन मोशी टोलनाक्याजवळ येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एका सदस्याला खबऱ्याकडून मिळाली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रमोद गर्जे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मोशी टोलनाक्याजवळ सापळा रचून आरोपी जॉनला पकडले. जॉनकडून 1 कोटी 10 लाख रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. या उलटीचे वजन 550 ग्रॅम आहे.

व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी

व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. व्हेल माशाच्या उलटीमध्ये अल्कोहोल असते. परफ्यूम बनवणाऱ्या कंपन्या व्हेल माशाच्या उलट्यांचा वापर करतात. त्यामुळे परफ्यूमचा सुगंध बराच काळ टिकतो. दरम्यान ही व्हेल माशांची विष्ठा आहे की उलटी आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण ताजे असताना त्याला विष्ठेसारखा वास येतो. हळूहळू ते मातीसारखे होऊ लागते. मग पाण्यात राहिल्याने ते थंड होऊन खडकासारखे दिसू लागते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला मोठी मागणी आहे. ते मिळवण्यासाठी काही लोक अवैधरित्या व्हेल माशांची शिकार करून त्याची तस्करी करतात. व्हेल प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याची शिकार करणे किंवा त्याच्या भागांचा व्यापार करणे बेकायदेशीर आहे. (One crore vomit of whale fish seized by Pimpri police)

इतर बातम्या

महिलेचा शेजाऱ्यावर जीव जडला, मग प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला; वाचा सविस्तर नेमके काय घडले?

मेरी बहन को मारा म्हणत चाकूनेच भोसकलं, औरंगाबादमधील कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर गंभीर जखमी!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.