अनैतिक संबंधामुळे गर्भवती राहिली, नंतर कोवळ्या बाळाला ओढ्यात फेकलं, चिमुकल्याच्या आक्रोषाने पुणेकर गहिवरले

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील आंबिल ओढ्यामध्ये एक दिवसीय बाळाला फेकून दिल्याची घटना घडली. अनैतिक संबंधातून बाळ जन्मल्यामुळे जन्मदात्या आईने हे कृत्य केले आहे. बाळाच्या रडण्यामुळे लोकांनी त्याच्याकडे धाव घेतली. तसेच आंबिल ओढ्याच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

अनैतिक संबंधामुळे गर्भवती राहिली, नंतर कोवळ्या बाळाला ओढ्यात फेकलं, चिमुकल्याच्या आक्रोषाने पुणेकर गहिवरले
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 9:16 PM

पुणे : अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या एक दिवसीय बाळाला ओढ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आईच्या या क्रूर कृत्याची निंदा केली जात आहे. ही घटना समजताच पोलिसांनी एक दिवसीय बाळाला ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. तर आईवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (one day child thrown because of immoral relationship pune police file case against unknown mother)

पोलिसांनी बाळाला रुग्णालयात दाखल केलं

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील आंबिल ओढ्यामध्ये एक दिवसीय बाळाला फेकून दिल्याची घटना घडली. अनैतिक संबंधातून बाळ जन्मल्यामुळे जन्मदात्या आईने हे कृत्य केले. बाळाच्या रडण्यामुळे लोकांनी त्याच्याकडे धाव घेतली. तसेच आंबिल ओढ्याच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बाळाला ओढ्यातून उचलून ससून रुग्णालायात दाखल केलं. डॉक्टरांनी या एक दिवसीय बाळाची प्राथमिक तपासणी केली असून सध्या त्याची प्रकृती उत्तम आहे.

आईविरोधात दत्तवाडी पोलिसात गुन्हा दाखल

मात्र, आईच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. जन्म घेऊन एकच दिवस झालेल्या बाळाला फेकून दिलेल्या आईविरोधात दत्तवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून बाळ सध्या ससून रुग्णालयातील डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली आहे.

इतर बातम्या :

नागपूरात डान्सिंग चोराची धूमाकूळ, डान्स करत वाहनांमधील पेट्रोल चोरतो

अनैतिक संबंधाच्या शंकेने पोखरलं, सूनेसोबत भाडेकरुचं अख्खं कुटंबच संपवलं, 5 जणांच्या हत्येमुळे खळबळ

भावासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीकडून पत्नीचा चाकू खूपसून खून

(one day child thrown because of immoral relationship pune police file case against unknown mother)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.