ऑनलाईन गेमचा नाद, 16 वर्षाच्या मुलाची 14 व्या मजल्यावरून उडी

Pune Crime News: जो मुलगा टेरिसवर जायला घाबरत होता, तो अचानक इतका बदलला की तो माझे देखील ऐकायला तयार नव्हता. त्यातून त्याला बाहेर काढण्याच्या खूप प्रयत्न केला, असे कुठल्या आईसोबत होऊ नये हीच, अशी अपेक्षा आहे.

ऑनलाईन गेमचा नाद, 16 वर्षाच्या मुलाची 14 व्या मजल्यावरून उडी
घटनेची माहिती पोलिस उपआयुक्त (झोन 1) स्वप्ना गोरे यांनी दिली.
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 12:49 PM

लहान मुलांमध्ये वाढत चाललेले मोबाईलचे व्यसन चिंता निर्माण करणार आहे. त्यातच किशोरवयीन मुले मोबाईल गेमच्या आहारी गेले आहेत. या गेममुळे मुलांचे मृत्यूही झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. आता पुन्हा पुणे शहरात ऑनलाईन गेममुळे एका 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील पिंपरी- चिंचवड भागातील किवळे परिसरात ही घटना घडली. एका 16 वर्षांच्या मुलाने आपल्या राहत्या इमारतीच्या 14 मजल्यावरून उडी मारुन जीवन संपवले. त्याने सुसाइड नोटही लिहिली आहे.

आत्महत्या केलेल्या मुलांने सुसाइड नोट लिहिली आहे. “लॉग आऊट नोट” अशी सुसाईड नोट लिहित मुलाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तसेच त्या मुलाने आपल्या नोट बूकमध्ये काही स्केच आणि मॅप काढले आहेत. त्यामुळे हा प्रकार समस्त पालकांमध्ये चिंता निर्माण करणारा आहे. XD हा गेम च्या आहारी जाऊन मुलाने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

लॅपटॉपचा पासवर्ड कोणालाच माहीत नाही?

आत्महत्या केलेल्या मुलाच्या लॅपटॉपचा पासवर्ड मुलांच्या आई-वडिलांना आणि पोलिसांना अजून देखील माहीत नाही. त्यामुळे मुलाने नेमका कोणता गेम खेळून आत्महत्या केली?, हे तपासाचे मोठे आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर आहे. मुलाच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सायबर एकस्पर्टची मदत घेणार आहेत. पालकांनी आपल्या मुलांचा मोबाइल लॅपटॉप सारख्या गॅझेटमध्ये टाईम मॉनिटर ठेवावे, जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्घटना टळतील, असे आवाहन पिंपरी- चिंचवड पोलिसांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

तो टेरिसवर जाण्यासही घाबरत होता…

या प्रकाराबाबत मुलाची आई म्हणते की, जो मुलगा टेरिसवर जायला घाबरत होता, तो अचानक इतका बदलला की तो माझे देखील ऐकायला तयार नव्हता. त्यातून त्याला बाहेर काढण्याच्या खूप प्रयत्न केला, असे कुठल्या आईसोबत होऊ नये हीच, अशी अपेक्षा आहे.

पोलिस उपआयुक्त (झोन 1) स्वप्ना गोरे यांनी सांगितले की, मुलाने रात्री १२.३० वाजता उडी मारली. त्या मुलाने सुसाइड नोटमध्ये “लॉग आऊट नोट” मिळाली आहे. त्याचे मोबाईल आणि लॅपटॉप तपासण्यासाठी तज्ज्ञांकडे पाठवण्यात येत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.