Pimpri -chinchwad crime | पिंपरी-चिंचवडला बालगुन्हेगारीचा विळखा ; बालगुन्हेगारांचे प्रमाण ऐकून तुमचेही डोळे विसफरतील
बालगुन्हेगारीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक कार्यरत आहे. या पथकातील पोलीस कर्मचारी या मुलांचे संपदेश करतात , याचबरोबर मुलांचेसमाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातात. याचबरोबर या मुलांना रोजगार दिला जातो. त्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षणही दिले जाते .
पिंपरी – चिंचवडमध्ये गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पोलीस प्रशासनासाठी डोके दुखी ठरत आहे यातच वाढत्या गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन आरोपींचा समावेश अधिक असल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत ही धक्कादायक बाबसमोर आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यानची आकडेवारी 76 खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. तारा खुनाचा प्रयत्न केल्याचे 122 गुन्हे नोंद झाले आहेत. यामध्ये पोलिसांनी खून केल्याच्या गुन्ह्यांमध्ये 10 तर खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात १३ जणांना अटक केली आहे. यामुळे शहरात बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे.
इतके घडले गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीसांनी गतवर्षी खूनाच्या आरोपाखाली 163 तर खूनाचा प्रयत्न केल्या प्रकेल्या प्रकरणी 372 लोकांना अटक केली. अश्याप्रकारे 535 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी खुनाच्या गुन्हयांपैकी 99 टक्के गुन्ह्यांची उकल केली आहे. गुन्हेगारीच्या घटनांमधील आरोपींमध्ये सर्वाधिक 30 वर्षाच्या आतील तरुण मुलांचा समावेश आहे. प्रेमात आलेले नैराश्य , बेरोजगार , पैसा , व्यसन आदी कारणामुळं हे सर्व आरोपी गुन्हेगारीकडे वळले असल्याचे दिसून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांचे स्वतंत्र पथक कार्यरत
बालगुन्हेगारीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक कार्यरत आहे. या पथकातील पोलीस कर्मचारी या मुलांचे संपदेश करतात , याचबरोबर मुलांचेसमाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातात. याचबरोबर या मुलांना रोजगार दिला जातो. त्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षणही दिले जाते .
नकळत्या वयात गुन्हेगारीच्या शिक्का लागलेलेअनेक लहान मुले व तरुण आहेत. या सर्व आरोपीना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करत आहे, मुलांच्याबरोबर त्यांच्या पालकांचेही समुपदेश केले जात आहे , अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी दिली आहे.
Mask | कोरोना विषाणू किती मिनिटांत गाठणार? मास्क ठरवणार! या 16 पैकी तुमचा मास्क कोणता?
Sonu Nigam Corona | सोनू निगमला कोरोनाची लागण, पत्नी आणि मुलगा देखील कोव्हिड पॉझिटिव्ह!
Chirag Gupta : गोरेगावचा चिराग गुप्ता कॅट परीक्षेत पहिल्यास्थानी, 100 पर्सेंटाईल मिळवत बाजी मारली