Pimpri Chinchwad Accident : भरधाव दुचाकीवर झाड कोसळलं! पुणे-नाशिक हायवेवरुन जाणाऱ्या दोघाही दुचाकीस्वारांवर काळाचा घाला, जागीच ठार
Pimpri Chinchwad Accident News : झाडं कोसळणं आणि दुचाकी नेमकी त्याच वेळी रस्त्यावर येणं, हे दुर्दैवाने एकाच वेळी घडलं आणि दोघांनाही डोक्यावर जबर मार बसून रक्तस्त्राव झाला.

पिंपरी-चिंचवड : भरधाव दुचाकीवरुन जात असतानाच झाड कोसळून दोघे ठार (Pimpri chinchwad accident) झाले आहेत. ही दुर्दैवी घटना पुणे-नाशिक महामार्गावर घडलीय. या घटनेत दोन्हीही दुचाकीस्वारांचा मृत्यू (Two bikers killed) झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते आहे. हा अपघात शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. भोसरी पोलीस (Bhosari Police Station) ठाण्यासमोरच ही काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. बाईकवरुन जात असलेल्या दोघा तरुणांचा या मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समाधान नथू पाटील आणि निलेश राजेश शिंगाळे अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांचं वय अनुक्रमे 36 आणि 37 वर्ष होतं. दुचाकीवरुन जात असतेवेळी थेट टोक्यावरच भाड कोसळल्यानं दोघेही तरुण जागीच दगावले.
हेल्मेट होतं, तरी…
समाधान आणि निलेश असे दोघे जण भोसरीवरुन नाशिक फाट्याच्या दिशेने जायला निघाले होते. यावेळी त्यांची भरधाव दुचाकी पोलीस ठाण्याच्या समोर येता क्षणी झाड कोसळलं. झाडं कोसळणं आणि दुचाकी नेमकी त्याच वेळी रस्त्यावर येणं, हे दुर्दैवाने एकाच वेळी घडलं आणि दोघांनाही डोक्यावर जबर मार बसून रक्तस्त्राव झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोघांकडे हेल्मेट होतं. मात्र मार इतका प्रचंड वेगाने झाला होता, की रक्तस्त्राव होऊ दोघेही तरुण ठार झाले. दोघाही तरुणांच्या डोक्यावर जोरात झाड आदळलं होतं.




अपघातामुळे वाहतूक कोंडी
या अपघातामुळे काही काळ नाशिक फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या नंतर अखेर अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव गेत झाड रस्त्याच्या बाजूला केलं आणि त्यानं या मार्गावरची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आणण्यात आलं. शनिवारी सकाळी नाशिक फाट्याच्या दिशेनं निघालेल्या दोघा मित्रांच्या मृत्यूनं संपूर्ण पुण्यात हळहळ व्यक्त केली जातेय.