पिंपरी चिंचवडमधील तरुणाला मारहाण प्रकरण; पोलिसांनी भररस्त्यात काढली आरोपींची धिंड

पिंपरी-चिंचवडमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली होती.पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांची भररस्त्यात धिंड काढली.

पिंपरी चिंचवडमधील तरुणाला मारहाण प्रकरण; पोलिसांनी भररस्त्यात काढली आरोपींची धिंड
आरोपींची धिंड
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 9:35 PM

पिंपरी : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. ‘भाई … का म्हटले नाही’ म्हणून एका तरुणाला टोळक्याकडून अमानुष मारहाण  करण्यात आली होती. मारहाणीवरच हे प्रकरण थांबले नाही, तर कुत्रे ज्या पद्धतीने बिस्किट खातात त्यापद्धतीने या तरुणाला बिस्कीटे खायला भाग पाडण्यात आले होते. सोशल मीडियावर (Social Media ) हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी (Pampiri Chinchwad Police) या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले होते. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रोहन वाघमारे (Rohan Waghmare) आणि त्याच्या साथीदारांची पोलिसांनी वाकड परिसरातून धिंड काढत त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या या कृतीचे स्वागत केले असून, यामुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होईल असे म्हटले आहे. रोहन वाघमारे याला संबंधित पीडित तरुणाने भाई न म्हटल्याने हा वाद झाला होता. आरोपीने आपल्या साथिदारांसह संबंधित तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच जमीवर पडलेले बिस्कीट त्याला तोंडाने उचलायला लावले होते.

नेमकं काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन वाघमारे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची तडीपारी संपल्याने तो हद्दीत आला होता. घटनेच्या वेळी आरोपी रोहनने पीडित तरुणाला भेटायला बोलावले. पीडित तरुण भेटायला गेल्यानंतर आरोपीने संबंधित तरुणाला  तू मला फोनवर शिवीगाळ का केली, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने तू मला रोहन का म्हणालास, मला भाई का नाही म्हणाला, मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणत रोहनने तरुणाला शिवीगाळ केली. तसेच कमरेच्या बेल्टने मारहाण करत जमीनीवर टाकलेली बिस्किटे खाण्यास भाग पाडले. इतर आरोपींनींही तरुणाला शिवीगाळ करत बेल्टने व लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केली होती.

आरोपींची धींड

दरम्यान या प्रकरणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांनी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपींना तब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी आज या आरोपींची भररस्त्यात धींड काढली आहे. नागरिकांनी पोलिसांच्या या कृतीचे स्वागत केले असून, यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल असे म्हटले आहे.

संबंधित बातम्या

रुद्र बी टू वाघाची शिकार! आता आणखी 4 आरोपींना बेड्या, का करण्यात आली वाघाची हत्या?

वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Terrible accident | पुण्यातील जुन्नर रोडवर भरधाव स्कार्पिओवरील चालकाचा ताबा सुटला अन जे झालं ते ….

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.