Pune Crime | गावठी कट्टा विक्रीला घेऊन आलेलया तिघांच्या आळेफाटा पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; एक फरार
जिल्ह्यातील शस्त्र बाळगण्याचे सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांचे वाढते फॅड पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. इतकेच नव्हे तर वाढत्या गुन्हेगारीसाठीही बेकायदेशीरपणे शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असल्याचेही समोर आले आहे.
पुणे – जुन्नर येथील आळेफाटा येथे गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या 3 आरोपींना आळेफाटा पोलीसांनी पिस्तूल व काडतुसासह अटक केली आहे. या कारवाई दरम्यान एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोन आठवड्यातील ही तिसरी घटना आहे.
अशी केली करावाई याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि आळेफाटा येथील मध्यवर्ती चौकात पिस्तूल विक्रीसाठी तरुण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून पंकज बाबाजी चाहेर (वय 22 ) अमिर मोहम्मद शेख (वय 24 ) दोघेही राहणार रांधे आळकुटी ता. पारनेर यांना बेकायदा शस्त्र विक्री प्रकरणी अटक केली आहे कारवाई वेळी पोलिसांनी बिगर परवाना 1 गावठी कट्टा, व 2 जीवंत काडतुसे असा एकुण 27 हजाराचा माल जप्त केला आहे. या दोघांना पिस्तूल व काडतूस पुरविणाऱ्या अजित पोपट आवारी (वय 25) ला ही ताब्यात घेतले आहे. मात्र याचा म्होरक्या आनिल आवारी (रा.कामोठे मुबंई) हा फरार असून पोलीस याचा शोध घेत आहेत.
गुन्हेगारीसाठी शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबरोबरच बेकायदेशीररित्या शस्त्रांची खरेदी विक्रीच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील आठवड्यातच पुणे शहरातीला सिंहगड रोड परिसरात पोलिसांची पिस्तूल विक्री करताना एकाला अटक केली होती. त्याचप्रमाणे बारामती येथेही पोलिसांनी २ गावठी कट्टासह काडतुसे हस्तगत करत कारवाई केली आहे. जिल्ह्यातील शस्त्र बाळगण्याचे सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांचे वाढते फॅड पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. इतकेच नव्हे तर वाढत्या गुन्हेगारीसाठीही बेकायदेशीरपणे शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असल्याचेही समोर आले आहे.
आरोग्य सुविधा देण्यात केरळ नंबर 1, महाराष्ट्राचा नंबर कितवा? यूपी, बिहार नेमके कुठे?
Corona vaccination | मुलांच्या लसीकरणाची 1 जानेवारीपासून नोंदणी, असे करा बुकींग…!