Pune Police : पोलीस “50” घ्यायला गेला आणि एसीबीच्या जाळ्यात आला, पुण्यातल्या लाचखोरीच्या प्रकरणाने खळबळ

सरकारी अधिकारी किंवा पोलीस लाच घेताना पकडले जाण्याची प्रकरणं जरी नवीन नसली तरी हे प्रकरण जरा वेगळं आहे. त्याला काही कारणेही तशीच आहेत.

Pune Police : पोलीस 50 घ्यायला गेला आणि एसीबीच्या जाळ्यात आला, पुण्यातल्या लाचखोरीच्या प्रकरणाने खळबळ
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 5:12 PM

पुणे : पुण्यात एक असं प्रकरण घडलंय (Pune Crime) जे बघून कोणीही डोक्याला हात मारेल. एक पोलीस (Police Officer Arrested) पन्नास हजारांची लाच घ्यायला गेला आणि थेट एसीबीच्या जाळ्यात आला. तेही पोलीस उपनिरीक्षक पदी असलेला अधिकारी एसीबीने रंगेहात पकडला आहे. पुण्यातल्या लाचखोर (Bribe) प्रकरणाने पुन्हा खळबळ वाजली आहे. मात्र हे प्रकरण पकडलं कसं याची कहाणीही तेवढीच इंटरेस्टिंग आहे. यासाठी एसीबीकडूनही जबरदस्त ट्रॅप लावला होता. सरकारी अधिकारी किंवा पोलीस लाच घेताना पकडले जाण्याची प्रकरणं जरी नवीन नसली तरी हे प्रकरण जरा वेगळं आहे. त्याला काही कारणेही तशीच आहेत. जो तक्रारदार न्यायाच्या अपेक्षेने या पोलीस अधिकाऱ्याकडे आला होता, त्यालाच गंडा घालण्याचा डाव या पोलीस अधिकाऱ्याचा होता.

कसा पकडला रंगेहाथ?

एका फसवणूक प्रकरणातील पैसे परत मिळवण्यासाठी हा तक्रारदार या पोलीस अधिकाऱ्याकडे फेऱ्या मारत होता, मात्र हे पैसे परत मिळवून देण्यासाठी या बाहदराने थेट त्याच्याकडे 50 हजाराच्या लाचेची मागणी केली आणि ही मागणी स्वीकारत असताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या उपनिरीक्षकावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सागर दिलीप पोमण असे या अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्रीही जबरदस्त कारवाई केली. यात या तक्रारदारानेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत कल्पना दिली होती. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे काम आणखी सोपं झालं.

हॉटेलाच लाच घेत होता

यातल्या या प्रकरणातल्या तक्रारदाराचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायातच त्याची आर्थिक फसवणूक झाल्याबाबत त्याने पोलीसात तक्रार दिली होती आणि तेच पैसे परत मिळवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र या प्रकरणात तक्रारदारांनी आर्थिक फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यासाठीच ही लाथ मागण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या ट्रॅपमध्येही हा लाच घेत असताना रंगेहात पकडला गेल्याने या पोलिस अधिकाऱ्याकडे दुसरा कोणता मार्ग उरलेला नाही. एका हॉटेलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.