आई, मुलाला बाहेर काढलं, बंद खोलीत पत्नीचा काटा काढला, गोळीबाराचा आवाजानंतर पुतण्या आला अन् जीवाला मुकला !

Pune Crime News : पुणे शहर सोमवारी पहाटे एका घटनेमुळे हादरले. एसीपी झालेल्या अधिकाऱ्याने आधी पत्नीवर गोळी झाडली, आवाज ऐकून पुतण्या धावला तर त्यालाही सोडलं नाही, मग स्वतः आत्महत्या केली.

आई,  मुलाला बाहेर काढलं, बंद खोलीत पत्नीचा काटा काढला, गोळीबाराचा आवाजानंतर पुतण्या आला अन् जीवाला मुकला !
Bharat Gaikwad
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 10:21 AM

पुणे | 24 जुलै 2023 : पुणे शहरात सोमवारी पहाटे दुर्देवी घटना घडली. बड्या पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या कुटुंबातील दोघांना संपवले. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. अमरावती पोलीस दलातील भरत गायकवाड यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नोती मिळाली होती. सोमवारी पहाटे त्यांनी आपल्या घरातच कहर केला. आधी पत्नीला गोळी मारली त्यानंतर पुतण्या धावत आला तर त्यालाही संपवले. त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. पोलिसांनी या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे.

नुकतीच मिळाले होते प्रमोशन

भरत गायकवाड (वय ५७) यांना नुकतचे वरिष्ठ पोलीस निरक्षकपदावरुन एसीपी म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली होती. ते अमरावती येथे कार्यरत होते. त्यांचे कुटुंब पुण्यात राहत होते. ते अमरावतीवरुन सुट्टी घेऊन पुण्यात आले होते. सोमवारी पहाटे चार वाजता त्यांनी पत्नी मोनी हिला गोळी मारली. गोळीबाराचा आवाज ऐकून पुतण्या दीपक धावत आला. त्यानंतर त्यालाही गोळी मारली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.

मुलगा अन् आईला खोलीच्या बाहेर काढले

भरत गायकवाड यांनी पत्नी मोनी गायकवाडवर (44) गोळी झाडली. त्यापूर्वी त्यांनी त्यांची आई आणि मुलगा सुहास यांना खोलीतून बाहेर काढले होते. परंतु गोळीबाराचा आवाज ऐकून आलेल्या पुतण्यालाही संपवले. या घटनेची माहिती सुहास गायकवाड याने पोलिसांना दिली. त्यानंतर तिघांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी केला तपास सुरु

तीन जणांचा मृत्यूचा प्रकार बाणेरमध्ये घडला. त्यानंतर पोलीस त्वरित घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा केला. भरत गायकवाड यांनी गोळ्या लायसन्स रिव्हॉल्वरमधून झाडल्या की त्यासाठी दुसरी पिस्तूल वापरली, हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा

पोलीस अधिकारी पुणे शहरात आला अन् नको ते करुन बसला, एका क्षणात सुखी संसाराचा अंत, कारण काय?

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.