पिंपरी-चिंचवड: पुण्यातील पिंपर-चिंचवड परिसरात एका हॉटेल चालकाकडून खंडणी उकळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही संबंधित अधिकारी लाचखोरीच्या प्रकरणात अडकला होता. मात्र, त्यानंतरही या पोलीस अधिकाऱ्याचे गैरप्रकार सुरुच होते. अखेर त्याच्यावर दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई झाली आहे.
मिलन कुरकुटे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे सध्या शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत होता. त्याने मुंढवा परिसरातील हॉटेल कार्निवलच्या मालकाकडून पैशांची मागणी केली होती. पोलिसांचा गणवेश घालूनच मिलन कुरकुटे हॉटेलमध्ये गेला होता. हा सगळा प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. याआधारे मिलन कुरकुटे याच्यावर कारवाई करण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच मिलन कुरकुटेला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर मिलनची बदली आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात करण्यात आली होती. निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा सेवेत रुजू झाला होता. मात्र, मध्यंतरी मिलन कुरकुटे काहीवेळ आजारपणाच्या सुट्टीवर होता. त्यावेळी त्याने हॉटेल कार्निवलमध्ये जाऊन पैशांची मागणी केली. त्यामुळे आता कुरकुटे दुसऱ्यांदा निलंबित झाला आहे.
संबंधित बातम्या:
ठाण्यात शिवसेना विभागप्रमुखावर जीवघेणा हल्ला, श्रीरंग सोसायटी शाखेतच चाकूने वार
दागिने बनावटीचे, पण गुन्हा गंभीर, आजीबाईच्या गळ्यातील चैन हिसकावून चोरटे पसार