आयपीएसची उमेदवारी रद्द झालेली पूजा खेडकर हिची एक, एक प्रकरणेसमोर येत आहेत. पूजा खेडकर हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केली होती. तीन वेगवेगळे नावे वापरुन यूपीएससीची परीक्षा 12 वेळा दिली होती. यूपीएससी परीक्षा देण्याची संधी केवळ नऊ वेळा असते. त्यामुळे 9 वेळा पूजा दिलीपराव खेळकर तर तीन वेळा पूजा मनोरमा दिलीप खेडकर हे नाव वापरत तीन यूपीएसची फसवणूक केली होती. तसेच पूजा खेडकर हिच्या अपंग प्रमाणपत्र आणि क्रिमिलेअर प्रमाणपत्रावरसुद्धा संशय निर्माण झाला आहे. यामुळे या प्रकरणी दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आता आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पूजा खेडकर हिने वेगवेगळी नाव देऊन कोर्टात याचिका दाखल केल्याचा दावा केला आहे.
विजय कुंभार यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, लेडी नटवरलाल पूजा खेडकर विविध नावे वापरण्यासाठी प्रसिद्ध आहे. डॉ. खेडकर पूजा दिलीपराव, सौ. पूजा दिलीपराव खेडकर, डॉ. कु. पूजा मनोरमा दिलीप खेडेकर अशी तीन नावे तिने पुन्हा वापरली आहे. कोर्टातील याचिकेत तीन नावे तिने वापरली आहे. कायदेशीर प्रक्रियेचा हा दुरुपयोग आहे. ती फरार आहे. तिच्या या चालींमागे कोण आहे? असा प्रश्न विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे.
Lady Natwarlal, #PujaKhedkar, notorious for her multiple aliases (Dr. Khedkar Puja Deeliprao, Mrs. Puja Diliprao Khedkar, Dr. Ms. Puja Manorama Dilip Khedekar), has sparked intrigue once again. Known for her previous deceptions in the UPSC exams, she has filed court cases under… pic.twitter.com/qTlsABan1O
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) August 6, 2024
पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकर हिच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याच्या तयारीत आहे. शिवाय बदनामी केल्याप्रकरणी पूजा खेडकर हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. कायदेशीर सल्ला घेऊन पुणे जिल्हाधिकारी पुढील कारवाई करणार आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात पूजा खेडकर हिने छळवणुकीचा आरोप केला होता. दरम्यान पुणे पोलिसांनी आतापर्यंत तीन समन्स बजावूनही पूजा खेडकर हजर झाल्या नाहीत.
फक्त पूजा खेडकर नाही तर असे अनेक अधिकारी बनावट प्रमाणद्वारे झाल्याची शक्यता विजय कुंभार यांनी व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी अमोल आवटे यांच्याही आता नाव घेतले आहे. गुजरात केडरचे अधिकारी अमोल आवटे यांनी ही खोटी माहिती दिल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. 2022 पूर्वी कसलीही दुखापत नसल्याची माहिती अमोल आवटे यांनी दिली होती. वास्तविक त्यांना दुखापत असल्याने UPSC कडून परीक्षा देण्यासाठी पाच वर्षाची सवलत मिळाली आहे. तरी ही ते माहिती खोटी देत असल्याचे कुंभार यांनी म्हटले. पूजा खेडकर प्रकरणात खेडकर हिच्यावर कारवाई झाली असली तरी UPSC चे अधिकारी ही त्यात सहभागी असू शकतात असा आरोप त्यांनी केला आहे.
हे ही वाचा
एक होती IAS पूजा खेडकर! अधिकारी बनवण्याचा रुबाब, कॅबिन अन् अंबर दिव्याची घाई, आता सर्वच गमावून बसली