ललित पाटीलनंतर ससूनमधून फरार झालेल्या दुसऱ्या कैद्याला अटक, पोलिसांनी असा रचला सापळा

Pune Sassoon hospital | पुणे ससून रुग्णालयातून कैदी ललित पाटील फरार झाला होता. या प्रकाराची पुनरावृत्ती पुन्हा झाली होती. मार्शल लुईस लीलाकर नावाच्या या कैद्याने पोलिसांना गुंगारा देऊन ससून हॉस्पिटलमधून त्याने पळ काढला आहे. आता आठ दिवसांनंतर त्याला अटक करण्यात यश आले आहे.

ललित पाटीलनंतर ससूनमधून फरार झालेल्या दुसऱ्या कैद्याला अटक, पोलिसांनी असा रचला सापळा
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 12:15 PM

अभिजित पोते, पुणे, दि. 17 फेब्रुवारी 2024 | पुणे शहरात ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती ११ फेब्रुवारी रोजी झाली होती. पुणे शहरातील ससून रुग्णालयातून ड्रग्स माफिया ललित पाटील ज्या पद्धतीने फरार झाला होता, त्या पद्धतीने आणखी एक कैदी फरार झाला. या कैद्याने गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मार्शल लुईस लीलाकर नावाच्या या कैद्याने पोलिसांना गुंगारा देऊन ससून हॉस्पिटलमधून त्याने पळ काढला आहे. आता आठ दिवसांनंतर त्याला अटक करण्यात यश आले आहे.

पहाटे झाली अटक

ससून रुग्णालयातून पसार झालेल्या आरोपी मार्शल लुईस लीलाकर याला पोलिसांनी पहाटे पावणे दोनच्या सुमारास अटक केली. लीलाकर ११ फेब्रुवारी रोजी सकाळी सायबर पोलिसांच्या ताब्यातून ससून रुग्णालयातून पसार झाला होता. लीलाकर याने कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना सोशल मीडियावर रीलद्वारे अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. त्यानंतर धमकी दिली होती.याबाबत पोलिसांनी आरोपी मार्शल लीलाकरला अटक केली.

कसा झाला होता फरार

मार्शल लुईस लीलाकर याला शरद मोहळ याच्या पत्नीला धमकी दिल्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याला येरवडा कारागृहामध्ये ठेवले होते. त्याने कारागृहामध्ये प्रकृती खराब असल्याची तक्रार केली. यानंतर त्याला ससून हॉस्पिटलमध्ये पाठण्यात आले होते. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी छातीत दुखत असल्याची तक्रार त्याने पोलिसांकडे केली. त्याला त्यानंतर तपासणीसाठी घेऊन पोलीस आले होते. त्यावेळी त्यांची नजर चुकवून लीलाकर पसार झाला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी सायबर आणि गुन्हे शाखेचे पोलिस पथक नेरळ आणि कर्जत येथे पाठवण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

अशी झाली अटक

लीलाकर हा येरवडा येथील मावशीच्या घरी आल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. सायबर पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली.आरोपी लीलाकरला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ललित पाटील याच्यानंतर लीलाकर पोलिसांच्या कस्टडीतून फरार झाला होता. त्यामुळे पुणे पोलिसांवर टीका होऊ लागली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.