Pune Drowned : गणपती विसर्जनाला गालबोट! 21 वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्यानं हळहळ
Pune Drowned News : पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात बोरिएंदी गावात ही घटना घडली. गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. संकेत सहदेव म्हेत्रे असं मृत तरुणाचं नाव आहे. तब्बल चार तासांच्या शोध माहिमेनंतर या तरुणाचा मृतदेह आढळून आला.
पुणे : गणपती विसर्जनाला (Ganpati Visarjan 2022) गालबोट लावणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा मृतदेह विहिरीत (21 year old boy drowned) आढळून आला आहे. या तरुणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय. तीन ते चार तासांनी या तरुणाचा मृतदेह (Pune Dead body Found) सापडला. शुक्रवारी गणपती विसर्जन करताना हा तरुण विहिरीत बुडाल्याची घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे.
नेमकी कुठे घडली घटना?
पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात बोरिएंदी गावात ही घटना घडली. गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. संकेत सहदेव म्हेत्रे असं मृत तरुणाचं नाव आहे. तब्बल चार तासांच्या शोध माहिमेनंतर या तरुणाचा मृतदेह आढळून आला. आपल्या पाच-सहा मित्रांसोबत मृत युवक हा गणपती विसर्जन करण्यासाठी विहिरीत उतरला होता.
पाहा लाईव्ह घडामोडी : व्हिडीओ
तब्बल 4 तास शोधमोहिम
दरम्यान, तरुण बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर यवत पोलीस स्टेशने पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले यांनी भेट दिली. पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर पाणबुड्याच्या साहाय्याने तब्बल चार तासांच्या शोधमहिमेनंतर तरुणाचा मृतदेह आढळून आला. तरुण विहिरीत बुडाल्याच्या बातमी गावभर पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
रात्री उशिरापर्यंत या तरुणाचा शोध विहिरीत घेतला जात होता. मोठ्या संख्येने गावातील लोक विहिरीपाशी जमले होते. अखेर पोलीस पथक आणि स्थानिकांच्या प्रयत्नानंतर या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मृत तरुणाच्या कुटुंबीयांवर या घटनेनं मोठा आघात झाला आहे. तरुणाच्या कुटुंबीयांना त्याचा मृतदेह पाहून काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला होता. या घटनेत संपूर्ण दौंड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय.