प्रियकरासोबत वारंवार वाद, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि मारहाण, विवाहितेचं टोकाचं पाऊल, पिंपरी चिंचवड हादरलं

पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देहूरोड परिसरात विवाहित महिलेनं प्रियकराशी झालेल्या वादानंतर फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

प्रियकरासोबत वारंवार वाद, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि मारहाण, विवाहितेचं टोकाचं पाऊल, पिंपरी चिंचवड हादरलं
प्रियकरासोबत वांरवार वाद, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि मारहाण, विवाहितेचं टोकाचं पाऊल, पिंपरी चिंचवड हादरलं
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 7:21 PM

पिंपरी चिंचवड (पुणे) : पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देहूरोड परिसरात विवाहित महिलेनं प्रियकराशी झालेल्या वादानंतर फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध आत्महेस प्रवृत्त केल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोघांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मृतक 26 वर्षीय महिला आणि आरोपी प्रसाद गायकवाड यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यामध्ये अनेकदा प्रियकर प्रसाद आणि मयत महिला याच्यांमध्ये वाद व्हायचे. त्यात आरोपी प्रसाद गायकवाड हा तिला शिवीगाळ करत मारहाण देखील करत होता. त्यामुळे महिलेने राहत्या घरात बेडरुममधील छताच्या फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलीस घटनास्थळी दाखल

आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी नेमकं प्रकरण काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी पोलिसांनी सोसायटीतील इतर रहिवाशांकडे विचारपूस केली. तेव्हा पोलिसांना घटनेमागील नेमकं कारण का ते लक्षात आलं.

पोलिसांकडून आरोपींना बेड्या

पोलिसांनी या प्रकरणी आरोपी प्रसाद गायकवाड आणि रितेश भालेराव या दोघांना अटक केली. तसेच तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दुसरीकडे मृतक महिलेला पाच-सहा वर्षांचा मुलगा देखील आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिकमध्ये बाळाची हत्या करुन आईची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

बाळाची हत्या करुन आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली होती. महिलेसोबतच बाळाचाही मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र महिलेच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. बाळाची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली आहे. मात्र सुसाईड नोटमध्ये या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे.

दोन मुलांच्या हत्येनंतर आईची आत्महत्या

दरम्यान, दोन चिमुकल्या मुलांची हत्या करुन महिलेने गळफास घेतल्याची घटना नुकतीच राजस्थान राज्यातील बाडमेरमध्ये उघडकीस आली होती. सहा वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांच्या मुलाचा जीव घेऊन विवाहितेने स्वतःचंही आयुष्य संपवलं. हुंड्याच्या दबावातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून बहिणीने सामूहिक आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. पोलिसांनी तिघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून पुढील तपास सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील वाकलपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली होती. रसाल कंवर हिचा विवाह सात वर्षांपूर्वी माधव सिंहसोबत झाला होता. माधव ट्रक चालक आहे. माधव आणि रसाल यांना सहा वर्षांची जसू ही मुलगी आणि तीन वर्षांचा विक्रम हा मुलगा आहे. शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत जेव्हा रसाल कंवरच्या घरातून कुठलीही हालचाल जाणवली नाही, त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून घरात डोकावून पाहिलं असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रसाल आणि तिची दोन्ही मुलं गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

हेही वाचा :

पनवेलमध्ये किरकोळ वादातून महिला पोलीस शिपाईकडून आपल्या सहकार्‍याच्या हत्येची सुपारी, तीन आरोपींना अटक

आधी 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, आता अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पुण्यात नेमकं चाललंय काय?

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.