मामांशी असलेल्या ठस्सनचा काटा काढण्यासाठी शरद मोहोळ याची हत्या

Sharad mohol murder case | पुणे शहरात गँगवारमधून शरद मोहोळ याची शुक्रवारी दुपारी हत्या झाली. तीन आरोपींना गोळ्या झाडल्याचे प्राथमिक तपास निष्पन्न झाले. या हत्येसंदर्भात पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी माहिती दिली.

मामांशी असलेल्या ठस्सनचा काटा काढण्यासाठी शरद मोहोळ याची हत्या
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 4:05 PM

योगेश बोरसे, पुणे, दि. 6 जानेवारी 2024 | पुणे शहरात शुक्रवारी भरदिवसा गोळीबाराचा थरार झाला. तीन हल्लेखोरांनी गुंड शरद मोहोळ याची भरदुपारी हत्या केली. या हत्या प्रकरणाचा सूत्रधार केवळ वीस वर्ष वय असलेला साहिल पोळेकर आहे. शरद मोहोळ आणि साहिल यांचे घर अगदी दोनशे मीटर अंतरावर होते. साहिल याच्या मनात अनेक दिवसांपासून शरद मोहोळ याच्या हत्येचा विचार असण्याची शक्यता आहे. यामुळे साहिल पोळकर आधी शरद मोहोळसोबत राहणाऱ्या लोकांच्या संपर्कात आला. त्यानंतर तो शरद मोहोळ गँगमध्ये सामील झाला, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पोकळे यांनी या हत्या प्रकरणाची माहिती देण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषद घेतली.

का केली हत्या

हत्या करणारे आरोपी शरद मोहोळसोबत होते. त्याच्यासोबत असलेल्या आणि बाहेर थांबलेल्या तीन आरोपींनी शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या. शरद मोहळ याची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर असलेल्या साक्षीदारांची चौकशी केली. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर शिरवळ येथे आठही आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून तीन पिस्तूल जप्त केले आहे. साहिल पोळेकर याचे मामा नामदेव कानगुडे आणि दुसरे नातेवाईक विठ्ठल किसन गांजने यांचे शरद मोहोळसोबत वैमनस्य होते. त्यातून ही हत्या झाली आहे.

गोळ्या झाडून पळ काढला

दुचाकीवरुन फरार झाला. त्याच्यावरुन शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्याकडे कार असल्याचे सांगितले. त्यावरुन आरोपींचा शोध सुरु केला. त्यानंतर ते शिरवळ येथे मिळाले. या ठिकाणी आठही जणांना अटक करण्यात आली. आरोपी चार महिन्यांपूर्वी हे पिस्तूल घेऊन आले होते. याच पिस्तूलने शरद मोहोळवर गोळ्या झाडण्यात आल्या. मुख्य आरोपी पोळेकर याने पिस्तूल जमा केले होते. अटक करण्यात आलेले अनेक आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

हे आहेत आठ आरोपी

  1. साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर(वय २०, रा. सुतारदरा, कोथरुड)
  2. विठ्ठल किसन गडले (वय ३४, रा. सुतारदरा, कोथरुड)
  3. अमित मारुती कानगुडे (वय २४, रा. धायरी)
  4. नामदेव महिपत कानगुडे (३५, रा. भूगाव)
  5. चंद्रकांत शाहु शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती),
  6. विनायक संतोष घवाळकर (वय २०, रा. कोथरुड),
  7. रवींद्र वसंतराव पवार (वय ४०)
  8. संजय रामभाऊ उउ्डाण (वय ४५, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड)

हे ही वाचा

दूर तुझसे मैं रहके बता क्या करू? लग्नाच्या वाढदिवशी शरद मोहोळचे पत्नीसाठी स्टेट्स

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.