पुणे, मुंबईत टाईम बॉम्बचा वापर करुन घातपातचा होता कट, पुणे शहरात कुठे करणार होते स्फोट
Pune Crime News : पुणे शहरातून दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या दोन्ही दशतवाद्यांच्या निशाण्यावर पुणे अन् मुंबई शहर होते. दोन्ही शहरात घातपात घडवण्याचा त्यांचा कट होता. एटीएस तपासातून ही माहिती समोर आलीय.
पुणे | 4 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातून इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी या दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना मदत करणाऱ्या अन् मास्टरमाइंड असलेल्या झुल्फीकार अली बडोदावाला, अब्दुल पठाण आणि रत्नागिरीमधील पेंडारी येथील सीमाब नसरुद्दीन काजी यांनाही पोलिसांनी अटक केली होती. पाच जणांना अटक झाल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दशतवाद्यांनी पुणे अन् मुंबईत घातपात घडवण्याचा कट आखला होता. १५ ऑगस्ट रोजी मुंबई आणि पुण्यातील अनेक ठिकाणी त्यांना स्फोट घडवायचे होते.
कुठे करणार होते स्फोट
इसिस अन् अल सुफाशी संबंधित दोन अतिरेक्यांनी टाईम बॉम्बच्या साह्याने घातपात घडवण्याचे कट आखला होता. पुणे आणि मुंबईतील सरकारी कार्यालय आणि गर्दीचे ठिकाणे त्यांचे लक्ष होते. तसेच भारत आणि इस्त्राईलमधील अनेक संस्था त्यांच्या निशाण्यावर होती. महाराष्ट्रात 1992-93 सारखे स्फोट घडवण्याची त्यांची योजना होती.
चोरीच्या मोटरसायकलवर प्रवेश
इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी यांनी चोरीच्या मोटरसायकलवरुन पश्चिम महाराष्ट्रात 1000 किमी प्रवास केला होता. बॉम्ब बनवल्यानंतर ब्लास्टसाठी ते जंगलांचा शोध घेत होते. त्यासाठी त्यांनी कोल्हापूरपासून ते सातारापर्यंत अनेक जागा निश्चित केल्या होत्या. सातारातील जंगलामध्ये त्यांनी बॉम्ब घडवण्याची ट्रॉयल केली होती.
अतिरिक्यांनी उभारली प्रयोगशाळा
दहशतवाद्यांनी एक प्रयोगशाळाही तयार केली होती. तसेच त्यांना मदत करणारे एटीएसच्या जाळ्यात आले आहेत. झुल्फीकार अली बडोदावाला हा त्यांना पैसे पुरवत होता. 2 दहशतवाद्यांच्या मदतीने इतर अनेक लोकांना बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम बडोदावाला करत होता. मेकेनिकल इंजीनिअर असलेला सीमाब नसरुद्दीन काजी हा त्यांना आर्थिक मदत करत होता. दोन्ही दहशतवाद्यांना पुण्यात घर देणे आणि त्यांना कामकाज देण्याचे काम अब्दुल पठाण याने केले होते. या सर्वांना एटीएसने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर एटीएसकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यातून धक्कादायक माहिती वास्तव समोर येत आहे.