Pune News : दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी एटीएसने आणखी एकास केली अटक

Pune Crime News : पुणे एटीएसने शनिवारी मोठी कारवाई करत एका आरोपीस अटक केली आहे. पुणे शहरात अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात ही चौथी अटक आहे.

Pune News : दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी एटीएसने आणखी एकास केली अटक
pune terrorist
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 1:47 PM

योगेश बोरसे, पुणे | 29 जुलै 2023 : पुणे शहरात १८ जुलै रोजी मोठी कारवाई झाली होती. शहरात दीड वर्षांपासून राहत असलेल्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. हे दोघेही दहशतवादी जयपुरात सीरियल ब्लास्ट प्रकरणातील होते. त्यांच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तब्बल दीड वर्षांपासून ते पुणे शहरात राहत असतानाही पोलिसांना थांगपत्ता लागला नव्हता. एका मोटारसायकल चोरी प्रकरणाची चौकशी करताना मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय २३) आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी (वय २४) हे दोघे सापडले. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला होता.

कोंढवा परिसरात राहत होता

मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी हे पुणे शहरातील कोंढव्यात राहत होते. या दोघांना कोंढवा येथे घर देणारा अब्दुल पठाण याला एटीएसने शुक्रवारी अटक केली होती. पठाण याने फक्त त्यांना घरच दिले नाही तर ग्राफिक डिझाईनचे कामही दिले. त्या कामासाठी त्यांना तो आठ हजार रुपये मासिक पगार देत होता. तसेच या दोघ दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा करणारा आणखी कोण आहे? याचा शोध एटीएस घेत होते.

हे सुद्धा वाचा

रत्नागिरीतील एकाला अटक

मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी यांना आर्थिक पुरवठा केल्या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. शनिवारी एटीएसने त्याला रत्नागिरीहून चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीनंतर दहशतवाद्यांशी त्याचा संबध असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे एटीएस त्याला अटक केली. या प्रकरणात एटीएसने केलेली ही चौथी अटक आहे. शिवाय परराज्यात एका संशयिताला नोटीस बजावण्यात आली आहे.

तो अद्याप फरारच

युसूफ खान आणि याकुब साकी याच्यासोबत असणारा तिसरा आरोपी शहानवाज आलम अजूनही फरार झाला. ATS कडून त्याचा शोध सुरु आहे. आलम याने या दोघांना लॉजिस्टिक मदत केली होती. त्याला लवकरच अटक होईल, असा विश्वास एटीएसकडून व्यक्त केला जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.