Pune Drowned : भोर तालुक्यात तलाठी तलावात बुडाला! पोहण्यात पटाईत, पण दम लागला आणि जीव गमावला

Pune Bhor Drowned : मुकुंद चिरके हे पोहण्यात पटाईत होते. पण...

Pune Drowned : भोर तालुक्यात तलाठी तलावात बुडाला! पोहण्यात पटाईत, पण दम लागला आणि जीव गमावला
...आणि तो पाण्यात बुडाला!Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 1:51 PM

पुणे : पावसात अंघोळीसाठी किंवा पोहण्याचा आनंद लुटायला म्हणून धरणाच्या पाण्यात, किंवा तलावात उतरणं जीवघेणं ठरु शकतं. वारंवार या जीवघेण्या सातत्यानं घटना अधोरेखित होत असूनही पोहण्याचा मोह आवरणं अनेकांना कठीण जातंय. अशातच पुण्यातील भोर (Pune Bhor Drowned) तालुक्यातील एका गावातील तलाठ्याचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण तालुक्यात खळबळ उडालीय. भोर तालुक्यातील वरवे गावातील तलाठी पोहण्यासाठी तलावात उतरला. पण पोहण्यासाठी (Swimming) तलावात उरलेला तलाठी पुन्हा बाहेर आलाच नाही. अखेर या तलाठ्याचा तलावात शोध घेण्यासाठी बचाव पथकाला तैनात करण्यात आलं. तलाठ्याचा बुडून मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच मोठ धक्का बसला. आता तलावात बुडालेल्या तलाठ्याच्या मृतदेह (Dead Body) शोधण्याचं काम सुरु आहे.

पोहण्यात सराईत, तरी बुडून मृत्यू

सोमवारी सकाळी मुकुंद चिरके हे आपल्या मित्रांसोबत तलावाच्या पाण्यात पोहायला उतरेल होते. सकाळी सात वाजता ते मित्रांसोबत पोहत असताना त्यांना दम लागला. तलावात पोहत असतानाच दम लागल्यानं मुकुंद चिरके यांचे हातपाय गळून पडले आणि बघता बघता पाण्यानं त्यांना आपल्या कवेत घेतलं. काही कळण्याच्या आतच मुकुंद यांच्या नाकातोंडात पाणी गेलं. त्यामुळे गुदमरुन मुकुंद यांना श्वास घेणं असह्य झालं. अखेरे ते पाण्यात बुडाले.

मुकुंद चिरके हे पोहण्यात पटाईत होते. पण पोहताना दम लागल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वी ते तलाठी म्हणून वेल्हा इथं कार्यरत होते. नुकतीच त्यांची बदली भोर इथं झाली होती. पावसात मित्रांसोबत पोहायला जावं, यासाठी ते उत्साहानं सकाळी मित्रांबरोबर भोर इथल्या तलावात गेले होते. पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या भोर तालुक्यात वरवे गावातील तलावात पोहायला गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

मित्र, कुटुंबीय शॉकमध्ये

32 वर्षीय मुकुंद यांच्या बुडून झालेल्या मृत्यूने त्यांच्यासोबतच्या मित्रांनाही मोठा धक्का बसला आहेा. तर चिरके कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा पोहण्यासाठी तलावात किंवा धरणाच्या पाण्यात जाणाऱ्यांनी काळजी घेण्याची आणि सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जातेय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.