पुणे अत्याचार प्रकरणातील त्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, त्या तिघांनी…
Pune Bopdev Ghat Gang-Rape Case: पुणे पोलिसांना बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणातील आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सासवडच्या बाजूला तीन संशयित एका दुजाकीजवळ थांबलेले दिसत आहेत. अत्याचाराची घटनानंतर साधारण 15 मिनिटांनी हे आरोपी पुढे जाऊन थांबले असतील.
Pune Bopdev Ghat Gang-Rape Case: पुणे येथील बोपदेव घाटात एका तरुणीवर अत्याचार झाला होता. मित्राबरोबर फिरण्यासाठी गेलेल्या सुरत येथील एका २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक अत्याचर केल्याची घटना गुरुवारी उघड झाली होती. या घटनेच्या तीन दिवसानंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले नाही. पुणे पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तीन टीम तयार केल्या आहेत. आरोपींचे स्केच झाली केले आहे. तसेच त्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहे.पुणे पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक डाटा यांच्या मदतीसुद्धा तपास करत आहे. परंतु त्यानंतर आरोपी पोलिसांना सापडले नाही.
काय आहे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये
पुणे पोलिसांना बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणातील आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सासवडच्या बाजूला तीन संशयित एका दुजाकीजवळ थांबलेले दिसत आहेत. अत्याचाराची घटनानंतर साधारण 15 मिनिटांनी हे आरोपी पुढे जाऊन थांबले असतील, अशी शक्यता आहे. रात्री 1.30 वाजेच्या नंतरचे हे सीसीटीव्ही फुटेज आहेत. त्या युवतीवर अत्याचार केल्यानंतरचे की त्याचा पूर्वीचे हे फुटेज आहेत त्याबाबत अजून काहीच स्पष्ट झाले नाही. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे तीन व्यक्ती पोलिसांनी जारी केलेल्या आरोपीच्या स्केचशी मॅच होत आहेत.
काय घडली होती घटना
सुरत येथील एक युवती पुण्यात शिक्षण घेत आहे. ती तिच्या जळगावच्या मित्रासोबत बोपदेव घाटातून रात्रीचे पुणे कसे दिसते, ते पाहण्यासाठी गुरुवारी (३ ऑक्टोंबर) रात्री ११ वाजता गेले होते. त्यावेळी तीन जणांनी त्यांना आडवले. त्या युवतीच्या मित्रास मारहाण केली. त्याला बांधून ठेवले. तिघांनी त्या युवतीवर अत्याचार केले. त्यानंतर त्या युवतीला खडी मशीन चौकात सोडून दिले. त्या युवतीने स्वत:ला सावरत मित्राची सुटका केली. त्यानंतर इतर मित्रांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Pune Bopdev Ghat Gang-Rape Case…police receive cctv footage pic.twitter.com/PTNVwxoJRh
— jitendra (@jitendrazavar) October 6, 2024
पुणे शहरासारख्या सांस्कृतिक शहरात अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. एक स्कूल व्हॅन चालकांने चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार पुण्यात उघड झाला. यामुळे पुणे शहर आता सुरक्षित राहिले नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
दरम्यान या आरोपींसंदर्भात माहिती मिळाल्यास खालील क्रमांकांवर माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
- 8691999689 (विनय पाटणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन),
- 8275200947/9307545045 (युवराज हांडे, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा)
- युनिट 5 नियंत्रण कक्ष : 02026122880