पुणे | 20 मार्च 2024 : पुणे शहरातील पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पिंपरी चिंचवडमधील थेरगाव भागात राहणाऱ्या भाऊसाहेब बेदरे यांची पत्नी माहेरी गेली होती. त्यानंतर मंगळवारी नैराश्यातून भयानक पाऊल उचलले. त्यांनी पोटच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेत जीवन संपवले. हा प्रकार का घडला? याचा खुलासा तपासातून होणार आहे. परंतु घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात या प्रकाराचे प्राथमिक कारण समोर आले आहे.
पिंपरी चिंचवडमधील थेरगाव येथे भाऊसाहेब बेदरे (वय ४३) त्यांची पत्नी राजश्री राहतात. त्यांना आठ वर्षांची नंदिनी आणि पंधरा वर्षांचा आशीष हा मुलगा आहे. या चौकणी कुटुंबात काय घडले? त्यामुळे दोन जणांचा जीव गेला, हा प्रश्न आहे. भाऊसाहेब बेदरे यांची पत्नी राजश्री माहेरी गेली होती, त्याचवेळी हा प्रकार घडला.
भाऊसाहेब यांच्या पत्नी राजश्री कामानिमित्त गावी गेल्या होत्या. त्यानंतर पहाटे त्या घरी परतल्या. त्यावेळी घरी नेण्यासाठी त्यांनी भाऊसाहेब यांना फोन केला. परंतु भाऊसाहेब यांना फोन उचलला नाही. त्यामुळे त्या स्वत: घरी पोहोचल्या. घरी आल्यावर आशिषने दरवाजा उघडला. त्यांनी बाबा कुठे आहेत? अशी विचारणा आशिषकडे केली. त्यानंतर बेडरुममध्ये गेल्यावर मुलगी झोपलेली दिसली. ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे त्यांना हादरा बसला. त्यानंतर किचनमध्ये आल्यावर भाऊसाहेब बेदरे यांनी गळफास घेतलेले दिसले. दोघांना तातडीने रुग्णालयात नेले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईट नोट मिळाली. त्यामध्ये कारण दिले आहे. आर्थिक विवंचनेतून जीवन संपवत असल्याचे भाऊसाहेब यांनी त्या नोटमध्ये म्हटले आहे. भाऊसाहेब बेदरे हे बांधकाम व्यवसायात आहेत. ते ठेके घेत असल्याची माहिती समोर आली आहे.