पालकांनो कोचिंग लावताना सावध व्हा… पुण्यातील JEE चे कोचिंग सेंटर बंद, शेकडो विद्यार्थ्यांनी भरले लाखो रुपये
कोचिंगमधील कर्मचाऱ्यांनी पगार व भाडे दिले जात नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर हे केंद्र अचानक बंद करण्यात आले. एका पालकाने सांगितले की, त्यांची मुलगी अकरावीत शिकते. त्याने आपल्या मुलीला FIITJEE मध्ये प्रवेश घेतला. कोचिंग क्लाससाठी 2.5 लाख रुपये एकरक्कमी शुल्क भरले.
अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेत प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा सुरु झाल्यापासून “कॉलेज बंद अन् कोचिंग सुरु”, अशी परिस्थिती झाली. आता विद्यार्थी महाविद्यालयात जात नाही. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी बड्या कोचिंगमध्ये प्रवेश घेतो. त्यासाठी लाखो रुपयांचे शुल्क भरतो. कोचिंगमध्येच अकरावी, बारावी जीईई अन् नीटची तयारी सुरु होते. परंतु कोचिंग निवडताना पालकांनी सावध राहण्याची गरज आहे. पुणे शहरातील फिटजी कोचिंग क्लास एका रात्रीतून बंद झाले आहे. शेकडो विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन कोचिंगचे संचालक फरार झाले आहे.
काय घडला प्रकार
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये फिटची कोचिंग सेंटर आहे. या कोचिंगमध्ये जीईईची तयारी करण्यासाठी 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यासाठी पालकांनी लाखो रुपये शुल्क त्या कोचिंगमध्ये भरले. परंतु हे कोचिंग एका रात्रीतून बंद पडले. कोचिंगचे संचालक फरार झाले आहेत. आता विद्यार्थ्यांचे पालक पोलीस ठाण्याच पोहचले आहेत. अनेक पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आश्रू आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्रीतम पांडे या पालकाने सांगितले की, पिंपरी चिंचवडमधील फिटजी कोचिंगमध्ये मुलीचा प्रवेश घेतला होता. आठवड्यापूर्वी कोचिंग सेंटरचे प्रमुख राजेश कर्ण यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनी कोचिंग बंद होणार असल्याचे अनौपचारिक चर्चेत सांगितले. परंतु काही माहिती मिळण्याआधीच कोचिंगला कुलूप लावून संचालक फरार झाले आहेत.
पालक म्हणतात, 2.5 लाख रुपये भरले
कोचिंगमधील कर्मचाऱ्यांनी पगार व भाडे दिले जात नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर हे केंद्र अचानक बंद करण्यात आले. एका पालकाने सांगितले की, त्यांची मुलगी अकरावीत शिकते. त्याने आपल्या मुलीला FIITJEE मध्ये प्रवेश घेतला. कोचिंग क्लाससाठी 2.5 लाख रुपये एकरक्कमी शुल्क भरले. परंतु आता संचालक फरार झाले आहे.
तक्रार नोंदवली अन्…
फिटजी कोचिंगचे एक सेंटर पिंपरी चिंचवडमध्ये तर दुसरे स्वारगेटमध्ये आहे. या कोचिंगमध्ये 300 पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. दोन्ही केंद्रावर जीईईची तयारी करुन घेतली जाते. आठवीपासून प्रवेश सुरु होतात. प्रत्येक वर्षी अडीच लाख रुपये शुल्क घेतले जाते. चिंचवड पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी पालकांची तक्रार नोंदवून घेतली असल्याचे सांगितले. तसेच शिक्षण विभागाला या प्रकरणाची माहिती दिली आहे.