‘सुर्वे, ठोबरेंच्या नादी लागतो काय’ असं म्हणत मुळशी तालुक्यात उपसंरपंचावर हल्ला, गाडीचीही तोडफोड

या संपूर्ण हल्ल्याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जामगावात खळबळ उडाली असून आता हल्लेखोरांनी शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

'सुर्वे, ठोबरेंच्या नादी लागतो काय' असं म्हणत मुळशी तालुक्यात उपसंरपंचावर हल्ला, गाडीचीही तोडफोड
मुळशी तालुक्यात एका गावातील सरपंचावर हल्ला
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 1:08 PM

पुणे : मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) जामगावच्या उपसरपंचांवर हल्ला करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. चार अज्ञातांनी येऊन उपसरपंच विरोन सुर्वे यांच्यावर हल्ला केला. तसंच गाड्यांची तोडफोड देखील केली. नीलेश सुर्वे आणि योगेश ठोंबरे यांच्या नादी लागतो, म्हणत विनोद सुर्वे (Vinod Surve) यांच्यावर हल्ला करत त्यांना धमकावण्यात आलं आहे. उपसरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी त्यांना धमकावत हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान हल्ला केल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी (Attacked) घटनास्थळावरुन पळ काळला आहे. सध्या हल्लेखोर आरोपींची पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या विनोद सुर्वे यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या संपूर्ण हल्ल्याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जामगावात खळबळ उडाली असून आता हल्लेखोरांनी शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय. दरम्यान, ज्या योगेश ठोंबरे यांच्या नावे हल्लेखोरांनी विनोद सुर्वे यांना धमकावलं आहे, ते कात्रज दुध संघाचे संचालक रामभाऊ ठोंबरे याचा पुतणे असल्याची माहिती मिळतेय.

तक्रारीत काय म्हटलंय?

विनोद सुर्वे यांनाही आधीही धमकावण्यात आली होतं. तशी तक्राही त्यांनी डिसेंबर महिन्यात पोलिसांत दिली होती. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी वाकड येथील घरातून ते जामगाव इथं जाण्यासाठी निघाले असता वाटेत औषधं आणि गोळ्या घेण्यासाठी थांबले होते. परत येत असताना दाकवली ओढ्याजवळ चौघांनी त्यांच्या इनोव्हा गाडीसमोर येऊन चालकाला धमकावण्यास सुरुवात केली. गाडीची काच खाली करण्यासाठी समोर हल्लेखोरांनी धमकावलं. यानंतर हातात कोयता घेऊन आलेल्या काहींनी तुला शेवटचा चान्स आहे, असं म्हणत विनोद सुर्वे यांना धमकावलं, असा दावा करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी तोंडाला पूर्णपणे कापड गुंडाळलेलं होतं. यावेळी शिविगाळ करत विनोद सुर्वे यांना धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तशी रितसर तक्राही पोलिसांत देण्यात आली आहे.

दरम्यान, यावेळी गाडीवर हल्ला करत गाडीची समोरील काच फोडून नुकसानही करण्यात आलं आहे. दगड घेऊन एका हल्लेखोरानं गाडीची काच फोडली आहे. याप्रकरणी विनोद सुर्वे यांनी पौड पोलिस स्थानकात तक्रार दिली असून आता याप्रकरणी हल्लेखोरांनावर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

संबंधित बातम्या :

पत्नीवर वाकडी नजर टाकायचा, रागाच्या भरात मित्राचा काढला काटा, भल्या पहाटे खळबळ

‘होय, सागरचा खून प्रेमप्रकरणातूनच!’ अडीच महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा, तलावात बुडण्याआधी सागरसोबत काय झालं?

करणी केल्याची भीती घालायचा, 28 वर्षांचा भोंदूबाबा सुशिक्षांताना लुटायचा! डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.